आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून फिल्म इंडस्ट्रीत आली नाही अमिताभ बच्चन यांची मुलगी, स्वतः केला होता खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील अमिताभ बच्चन आणि मुलगी नव्या नवेली नंदासोबत श्वेता बच्चन - Divya Marathi
वडील अमिताभ बच्चन आणि मुलगी नव्या नवेली नंदासोबत श्वेता बच्चन

मुंबई:  अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिचा आज वाढदिवस असून ती 44 वर्षांची झाली आहे. 17 मार्च 1974 रोजी मुंबईत श्वेताचा जन्म झाला. बच्चन कुटुंबातील श्वेता एकमेव अशी व्यक्ती आहे, जी सिनेसृष्टीत कार्यरत नाही. सिनेसृष्टीत पदार्पण का केले नाही, याचा खुलासा स्वतः श्वेताने एका मुलाखतीत केला होता. श्वेता बच्चनने काही दिवसांपूर्वी एका प्रसिध्द वर्तमानपत्रात कॉलम लिहून यामागचे कारण सांगितले होते. 

 

स्टेजवर येताच शॉट विसरली होती श्वेता...
श्वेता बालपणी तिची आई आणि अभिनेत्री जेया बच्चन यांच्यासोबत चित्रपटांच्या सेटवर जात असे. आईवडिलांच्या बिझी शेड्युलमुळे तिला त्यांच्यासोबत फार कमी वेळ घालवता आला. श्वेताच्या सांगण्यानुसार, 'शाळेत असताना मी काही नाटकांमध्ये काम केले होते. मात्र अभिनयाकडे करिअर म्हणून बघावे, असा खास अनुभव कधीच मला आला नाही. शाळेच्या नाटकात मी हवाइयन मुलीची भूमिका साकारली होती. क्लायमॅक्समध्ये मी माझा शेवटचा शॉटच विसरुन गेली होती. तो अतिशय वाईट अनुभव होता.' श्वेता एक ब्लॉगर आहे आणि तिने जर्नालिस्ट म्हणूनसुध्दा काम केले आहे.

 

रणबीर कपूरची वहिनी आहे श्वेता...
श्वेता बच्चनचे लग्न 1997 मध्ये निखिल नंदासोबत झाले होते. निखिल नंदा हा अभिनेता रणबीर कपूरच्या आत्याचा मुलगा आहे. या नात्याने श्वेता रणबीरची वहिनी होते. श्वेता आणि निखिल यांना नव्या ही मुलगी आणि अगस्त्य हा एक मुलगा आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, श्वेता बच्चन नंदा हिचे काही निवडक फोटोज...