आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : 18 वर्षांची झाली शाहरुखची मुलगी, आई गौरीने शेअर केला Gorgeous फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शाहरुख खानची मुलगी सुहाना आता 18 वर्षांची झाली आहे. 22 मे 2000 रोजी मुंबईत सुहानाचा जन्म झाला. सुहानाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत  वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिची आई गौरी खान हिने सुहानाचा एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर करुन, 'Gearing up for a birthday bash... Thanks @karanjohar', असे कॅप्शन दिले. या फोटोमध्ये सुहानाचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधूून घेतोय.  

 

सुहानाला घाबरतो शाहरुख खान...
शाहरुख खानने अनेकदा त्याच्या मुलाखतींमध्ये तो सुहानाला घाबरत असल्याचा उल्लेख केला आहे. सुहाना अतिशय समजूतदार असून चुकीचे काम करत असताना टोकत असल्याचे शाहरुखने मुलाखतींमध्ये सांगितले आहे. सुहाना लहान असताना शाहरुख तिला सिनेमाच्या सेटवर सोबत घेऊन जात असे.  


सुहानाला व्हायचे आहे अभिनेत्री... 
एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते, की सुहानाची अभिनेत्री व्हायची इच्छा आहे. सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे, तिने काजोलकडून अभिनयाचे बारकावे शिकावे, अशी शाहरुखची इच्छा आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, शाहरुख आणि गौरीची लाडकी लेक सुहानाचा होश उडवणारा ग्लॅमरस अंदाज छायाचित्रांमध्ये...

बातम्या आणखी आहेत...