आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: आता अशी दिसते \'वास्तव\' गर्ल, स्वतःपेक्षा 3 वर्षांनी लहान साऊथ सुपरस्टारसोबत केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 1999 मध्ये रिलीज झालेल्या 'वास्तव' या सिनेमात संजय दत्तच्या प्रेयसीची भूमिका वठवणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आता 46 वर्षांची झाली आहे. 22 जानेवारी, 1972 रोजी जन्मलेली नम्रता 1993 साली मिस इंडियाचा ताज जिंकून पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धत ती पाचव्या स्थानावर होती. ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर काही वर्षे मॉडेलिंग करुन नम्रता सिनेसृष्टीकडे वळली होती. मात्र आता नम्रता लाइमलाइटपासून दूर गेली आहे.


स्वतःपेक्षा लहान वयाच्या अभिनेत्यासोबत थाटला संसार...
बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर नम्रता साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळली. 2000 मध्ये तेलगू फिल्म ‘वामसी’च्या शूटिंगच्या काळात तिची भेट साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत झाली. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर फेब्रुवारी 2005 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने तीन वर्षांनी लहान आहे. महेश आणि नम्रता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गौतम हे त्यांच्या मुलाचे तर सितारा हे मुलीचे नाव आहे.

 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, नम्रता शिरोडकर हिच्याविषयी बरेच काही...

बातम्या आणखी आहेत...