आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी ड्रग्स स्कँडल तर मुलगा अडकला मर्डर केसमध्ये, Controversial आहे या अॅक्ट्रेसची फॅमिली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जरीना वहाब आणि आदित्य पांचोली आणि त्यांची मुले सना-सूरज - Divya Marathi
जरीना वहाब आणि आदित्य पांचोली आणि त्यांची मुले सना-सूरज

एन्टरटेन्मेंट डेस्क- बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या आयुष्याला वादाची किनार आहे. टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री जरीना वहाबदेखील याला अपवाद ठरलेली नाही. पण जरीना स्वतः नव्हे तर तिचा नवरा आणि मुलं वादात अडकली आहेत. नवरा आदित्य पांचोली, मुलगा सूरज पांचोली आणि मुलगी सना पांचोली यांची नावे मोठ्या वादात अडकली आहेत. जरीना वहाबने 17 जुलै रोजी वयाची 59 वर्षे पूर्ण केली आहेत.  या पॅकेजमधून  जाणून घेऊयात जरीना वहाबच्या कुटुंबीयांशी निगडीत वादांविषयी...


आदित्यने को-स्टारच्या लगावली होती थोबाडीत...
आदित्य पांचोली त्याच्या सिनेमांपेक्षा वादांसाठीच जास्त ओळखला जातो. 'लाखों हैं यहां दिलवाले' (2016) या सिनेमाच्या सेटवर आदित्यने त्याचा को-स्टार विजे भाटियाच्या थोबाडीत मारले होते. इतकेच नाही तर 2015 साली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. शिवाय कंगना रनोटसोबतचे त्याचे अफेअरसुद्धा खूप गाजले होते. पूजा बेदीच्या घरी काम करणा-या 15 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हे वाद इथवरच थांबले नाहीत. शेजा-याला मारहाण करण्यापासून ते मीडियाला शिवीगाळ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 


1986 साली 'कलंक का टीका' या सिनेमाच्या सेटवर जरीनाची भेट आदित्य पांचोलीसोबत झाली होती. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि जरीनाने तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या आदित्यसोबत लग्न थाटले. जरीनाने 'घरौंदा' (1977), 'तुम्हारे लिए' (1978), 'अपराध' (1978), 'सावन को आने दो' (1979), 'गोपाल कृष्ण' (1979), 'सलाम मेमसाहब' (1979), 'जज्बात' (1980), 'नैया' (1979), 'सितारा' (1980), 'आखिरी मुजरा' (1981), 'मैंने जीना सीख लिया' (1982), 'लाल चुनरियां' (1983), 'दहलीज' (1986), 'माई नेम इज खान' (2010), 'अग्निपथ' (2012), 'हिम्मतवाला' (2013) सह अनेक गाजलेल्या सिनेमांत अभिनय केला आहे. याशिवाय ती दाक्षिणात्य सिनेमांमध्येही झळकली आहे.


पुढील स्लाईड्सवर वाता, जरीनाची-आदित्यची मुले कोणत्या वादात अडकली...  

बातम्या आणखी आहेत...