Home »Gossip» Biwi Ho To Aisi: Salman Khan Actress Renu Arya Disappeared

अवघ्या 4 वर्षांत संपले या बॉलिवूड अॅक्ट्रेसचे करिअर, 26 वर्षापासून कुठे आहे कुणालाच नाही थांगपत्ता

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 00:38 AM IST

  • 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातील एका दृश्यात सलमान आणि रेणू

मुंबई - 1988 साली रिलीज झालेला सलमान खानचा डेब्यू चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' रिलीज होऊन आता जवळजवळ 30 वर्षांचा काळ लोटला आहे. या चित्रपटात फारुख शेख आणि रेखा लीड रोलमध्ये झळकले होते. तर अभिनेता सलमान खानचा हा पहिला चित्रपट होता. यात त्याने सहायक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. चित्रपटात सलमानची जोडी अभिनेत्री रेणू आर्या हिच्यासोबत जमली होती. पण आज ही अभिनेत्री कुठे आणि काय करतेय, याची माहिती कुणालाच नाही.

4 वर्षांतच संपुष्टात आले रेणूचे फिल्मी करिअर...
- रेणूचे करिअरही सलमानप्रमाणेच 1988 साली सुरु झाले होते.
- रेणूने 'चांदनी', 'बंजारन' आणि 'जंगबाज' यांसारख्या चित्रपटांत काम केले. यानंतर ती फिल्म इंडस्ट्रीमधून बाहेर पडली.
- काही वर्षांपूर्वी सलमानने एका मुलाखतीत रेणूचा उल्लेख करताना सांगितले होते, की त्याची भेट एकदा फ्लाईटमध्ये रेणूसोबत झाली होती. पण तिचा चेहरा इतका बदलला होता, की तिला ओळखणे त्याला क्षणभर कठीण झाले होते.
- सलमानने सांगितल्यानुसार, फिल्म इंडस्ट्रीतून कुणीही रेणूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही.
- चित्रपटात लहान-सहान भूमिका करुन रेणूने थोडीफार प्रसिद्धी मिळवली.
- तसे पाहिले तर, रेणूने सलमान खान, रेखा, फारुख शेख यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले, पण तिला यश मिळू शकले नाही.

- रेणूचा शेवटचा चित्रपट 1991 साली आलेला 'बंजारन' हा होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि गेल्या 26-27 वर्षांपासून रेणू कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही.

पुढील स्लाईड्वसर पाहा, रेणू आणि सलमानचे काही खास PHOTOS...

Next Article

Recommended