आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Blast From The Past: Most Shocking Photoshoots Of Kajol, Aamir, Madhuri, Akshay & Jackie Shroff

गर्लफ्रेंडची बिकिनी घालून जग्गूदादाने केले होते हे फोटोशूट, बघा स्टार्सचे खळबळ उडवून देणारे फोटोशूट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते त्यांचे सिनेमे असो, लव्ह अफेअर्स असो, वैवाहिक आयुष्य असो, किंवा मग फोटोशूट्स असो... आज आम्ही तुम्हाला बी टाऊन स्टार्सच्या 80 ते 90 च्या दशकातील फोटोशूट्सविषयी सांगत आहोत.

 

सुरुवात करुयात बॉलिवूडच्या जग्गूदादा अर्थातच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यापासून. आज (01 फेब्रुवारी) वयाची 61 वर्षे पूर्ण करणा-या जॅकी श्रॉफ यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक मॅगझिन्ससाठी फोटोशूट केले होते. वरील छायाचित्रात दिसणारे त्यांचे हे छायाचित्र स्टारडस्ट या मॅगझिनमध्ये प्रकाशित झाले होते. या फोटोशूटचा एक रंजक किस्सा आहे. काही दिवसांपूर्वीच एका शोमध्ये स्वतः जॅकी श्रॉफ यांनी तो किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला होता.


गर्लफ्रेंडच्या बिकिनीत केले होते फोटोशूट.. 
या फोटोशूटमध्ये जॅकी श्रॉफ एका स्वीमिंग पूलमध्ये झोपलेले दिसत आहे. त्यांनी फक्त अंडरविअर घातलेली दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी घातलेले अंतवर्स्त्र हे त्यांची त्याकाळची गर्लफ्रेंड आणि आता त्यांची पत्नी असलेल्या आयशा श्रॉफ यांची बिकिनी आहे. जॅकी श्रॉफ यांनी सांगितले, "त्याकाळी फोटोशूटसाठी आम्हाला आमचे कपडे वापरावा लागत असे. करिअरचा सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे नवीन कपडे खरेदी करु शकु, एवढे पैसे नसायचे. स्वतःच्या दोन अंडरविअर धुवून मी वापरायचो. स्टारडस्ट मॅगझिनने फोटोशूटची ऑफर दिली होती. पण कॉश्च्युम माझ्याजवळ नव्हते. त्यामुळे मी त्यावेळी माझी गर्लफ्रेंड आणि नंतर माझी पत्नी झालेल्या आयशाला तुझ्याजवळ स्विमिंग कॉश्च्युम आहे म्हणून विचारले. तिच्याजवळ टू पीस बिकिनी होती. तिच्या टू पीस बिकिनीतील बॉटम घालून मी हे फोटोशूट केले होते."

 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊन स्टार्सच्या 80 ते 90 च्या दशकातील फोटोशूट्सची खास झलक दाखवत आहोत. केवळ जॅकी दादांनीच नव्हे तर त्याकाळात माधुरी दीक्षित, काजोल, अक्षय कुमार, रेखा, पूजा भट, करिश्मा कपूर, अक्षय कुमार यासह अनेक स्टार्सनी केलेल्या फोटोशूट्सने खळबळ उडवून दिली होती. अनेक मॅगझिनच्या कव्हरपेजवर हे स्टार्स बोल्ड लूकमध्ये झळकले होते. स्टार्सचे हे फोटोशूट त्यांच्या चाहत्यांना अचंबित करणारे होते. पूजा भट आणि महेश भट यांच्या किसींग फोटोशूटवर बरीच टीकासुद्धा झाली होती. विशेष म्हणजे एकेकाळी केलेले हे फोटोशूट आज हे स्टार्स बघू इच्छिणार नाहीत. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊन स्टार्सचे खळबळ उडवून देणारे फोटोशूट्स...

बातम्या आणखी आहेत...