आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अभ्यासामुळे सनी दादाने मला मारले आहे - बॉबी देओल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आगामी चित्रपट 'रेस-3' मधून बॉबी देओल कमबॅक करत आहे. बॉबी देओल सध्या पर्सनल लाइफ आणि कमबॅकविषयी मोकळेपणाने चर्चा करतोय. या दरम्यान बॉबी आपला मोठा भाई सनी देओलविषयी बोलला आहे. 


सनी दादा स्वतः अभ्यास करत नव्हता मलाही करु देत नव्हता
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉबीने मोठा भाऊ सनीसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणाने चर्चा केली. बॉबीने सांगितले की - दादा आणि माझ्यात कधीच भांडण झाले नाही असे नाही. आमच्यात आजही भांडण होतात. बॉबीने बालपणीचे किस्से ऐकवले. तो म्हणाला 'बालपणी अभ्यासासाठी सनी भैया मला खुप मारायचा. एकदा टीचरने माझी तक्रार केली होती तेव्हा त्याने मला खुप मार दिला होता. उत्तर देत मी म्हणालो होतो की- स्वतः तर अभ्यास केला नाही आणि मला मारतोय...अभ्यासासाठी एकदा वडिलांनीही मला मारले आहे. वडिलांनी कानाखाली मारल्यानंतर मी खुप रडलो होतो.' 12 वी नंतर सनीने शिक्षण सोडले होते.


15 ला रिलीज होणार रेस-3
डायरेक्टर रेमो डिसूजाचा 'रेस-3' चित्रपट याचवर्षी ईदला म्हणजेच 15 जूनला रिलीज होणार आहे. चित्रपटात सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिज, डेजी शाह, शाकीब सलीम फ्रेडी दारुवाला प्रमुख भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...