आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी रात्रीतून स्टार झालेल्या बॉबीचे अच्छे दिन परतणार का? गेला होता दारुच्या आहारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या पहिल्याच चित्रपटातून एका रात्रीतून स्टार झालेला अभिनेता बॉबी देओलने आज वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहे. 27 जानेवारी 1967 रोजी अभिनेते धर्मेंद्र यांच्या घरी बॉबीचा जन्म झाला. बरसात चित्रपटातून फिल्मी करिअरच्या प्रवासाला सुरुवात करणा-या बॉबीने सुरुवातीच्या काळात यशाची चव चाखली खरी पण हे यश त्याला फार काळ टिकवता आले नाही.

 

यमला पगला दीवाना, यमला पगला दीवाना 2, प्लेयर्स, झूम-बराबर झूम, थँक्यू, वादा रहा, दोस्ताना, अपने, शाकालाका बूम-बूम, सिंह साहब द ग्रेट, बरसात, टँगो चार्ली, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, हमराज, अजनबी, बादल, दिल्लगी यासह अनेक चित्रपट करणा-या बॉबीला करिअरच्या मधल्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले.

 

तब्बल तीन वर्षानंतर त्याने काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या पोश्टर बॉईज या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक केले. पण पुन्हा एकदा त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. त्याचे कमबॅक फ्लॉप ठरले. पण आता रेस 3 या चित्रपटाकडून बॉबीला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटातून दमदार एन्ट्री घेण्यासाठी बॉबी देओलने जोरात तयारी सुरु केली आहे. रेमो डिसूजा दिग्दर्शित या चित्रपटात बॉबी नेव्हर सीन बिफोर अवतारात असणार आहे. वरील छायाचित्रात तुम्ही बॉबीने त्याच्या बॉडीवर घेतलेली मेहनत स्पष्ट दिसतेय. सलमान खान, डेजी शाह यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. 


लोकांनी दिल्या या कमेंट
बॉबी देओलने हा फोटो ट्विटरवर पोस्ट करताच लोकांनी कमेंटचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. लोकांनी बॉबी देओलच्या स्लिम आणि स्लीक बॉडी बनवल्याबद्दल कौतुक केले.


युझर्स काय म्हणाले?
एक यूझर म्हणाला, सिनेमासाठी बेस्ट ऑफ लक पाजी. रेस ३मध्ये यशस्वी व्हा. तर दुसरीकडे एक युझर म्हणाला, देर आए दुरुस्त आए. कीप इट अप.


सलमानने दिले प्रोत्साहन
रेस 3 मधील लूकसाठी सलमानने प्रेरित केल्याचे बॉबीचे म्हणणे आहे. त्याने ट्विटरवरन सलमानचे आभारही मानलेत. 


पुढे वाचा, कठीण काळात दारुच्या आहारी गेला होता बॉबी...

बातम्या आणखी आहेत...