आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला बॉबी म्हणतो \'My Life\', एकेकाळी धर्मेंद्र यांना हवा होता यांच्यापासून घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉबी देओलने गेल्यावर्षी 26 जानेवारी रोजी त्याचे इंस्टाग्राम अकाउंट ओपन केले होते. त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला पहिला फोटो आई प्रकाश कौर यांच्यासोबतचा आहे. आईसोबतचा फोटो शेअर करुन बॉबीने त्याला कॅप्शन दिले होते, 'My Life'. बॉबी कायम आईवडिलांसोबतचे फोटोज त्याच्या अकाउंटवर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने आईवडिलांसोबतचा त्याचा बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. त्यासोबत त्याने लिहिले, 'the Loves of my life so blessed to be their child'. बॉबीने शेअर केलेले त्याचे फोटोज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बॉबीचे वडील धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले आहेत. बॉबीची आई प्रकाश कौर या धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आहेत. तर अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी दुसरे लग्न केले. वैवाहिक आयुष्यामुळे धर्मेंद्र कायम चर्चेत राहिले.

 

वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते. या दाम्पत्याला दोन मुली आणि दोन मुले आहेत. सनी देओल, बॉबी देओल ही त्यांच्या मुलांची तर विजेता आणि अजीता ही त्यांच्या मुलींची नावे आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर धर्मेंद्र यांच्या आयुष्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलला आणि त्यांनी लग्न केले. हेमा यांच्यासोबत लग्नाच्या वेळी धर्मेंद्र पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट देऊ इच्छित होते. पण प्रकाश कौर यासाठी तयार नव्हत्या.


...म्हणून धर्मेंद्र यांनी धर्म बदलून केले हेमासोबत लग्न...
धर्मेंद्र विवाहित होते, पण ड्रीमगर्लसाठी त्यांनी सर्व बंधने झुगारुन टाकली. त्यांनी धर्म परिवर्तन करुन हेमा यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले. हा तो काळ होता, जेव्हा त्यांची मुलगी लग्नाच्या वयात आली होती. तर मुलगा सनी देओल सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत होता. तरीदेखील धर्मेंद्र यांनी 2 मे 1980 रोजी हेमा यांच्यासोबत लग्न केले. जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न झाले, तेव्हा हेमा यांचे फिल्मी करिअर यशोशिखरावर होते. त्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. लग्नाच्यापूर्वीच हेमा आणि धर्मेंद्र यांनी 12 हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.


बॉबी देओलचे फिल्मी करिअर ठरले फ्लॉप...
बॉबी देओलने 'बरसात' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्याचा हा पहिला चित्रपट हिट ठरला. पण पुढे मात्र त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. दीर्घ काळानंतर त्याचा 'पोस्टर बॉईज' हा चित्रपट रिलीज झाला, खरा पण हाही चित्रपट फ्लॉपच्या यादीत आला. एका मुलाखतीत बॉबी म्हणाला होता, 'मी गेल्या चार वर्षांत काहीच केले नाही. कदाचित मी अपिलिंग नव्हतो आणि मला हवी तशी भूमिकासुद्धा मिळाली नाही. हा काळ अतिशय निराशाजनक होता.' असे म्हटले जाते, की चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे बॉबी दारुच्या आहारी गेला होता. पण पत्नी तान्याने त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढले. आता बॉबी रेस 3 या चित्रपटात झळकणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, देओल फॅमिली मेंबर्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...