आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 कोटीत तयार झाले शाहरुख खानचे आलिशान फार्म हाऊस, बघा INSIDE फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या त्याच्या अलिबागमधील फार्म हाऊसमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या या फार्म हाऊसला आयकर विभागाने टाळे ठोकले आहेत. शेतीसाठीची जमीन फार्म हाऊससाठी वापरल्याने आयकर विभागाने ही कारवाई केली. 90 दिवसांपूर्वी आयकर विभागाने शाहरुखला याबाबत नोटीस पाठविली होती. शाहरुख खानने शेतीसाठी म्‍हणून अलिबाग येथे 19 हजार 960 चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. मात्र, त्याठिकाणी शाहरुखने फार्म हाऊस बांधले. याप्रकणी शाहरुखला नोटीस देण्यात आली होती. नियमानुसार नोटीस पाठविल्यानंतर 90 दिवसांच्या आत त्याला उत्तर देणे बंधनकारक असते. अन्यथा संपत्ती जप्‍त केली जाते. या फार्म हाऊसची किंमत 146.7 कोटी असून एका आयकर अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार बाजारमुल्यात पाचपट वाढ होऊ शकते.

 

या फार्म हाऊसमध्ये कुटुंबासोबत घालवतो निवांत क्षण..  
शाहरुखचे अलिबागचे फार्म हाऊस येथील थलबीच समोर आहे. येथे पोहोचण्यासाठी बोटची मदत घ्यावी लागले. 2015 मध्ये शाहरुखने ही जमीन खरेदी केली होती. येथे आठ एकरमध्ये तब्बल 15 कोटी रुपये खर्च करुन शाहरुखने आलिशान बंगला बांधला आहे. शिवाय मोठ्या जागेत झाडे लावण्यात आली आहेत. शाहरुखचा हा बंगला सी फेसिंग आहे. यामध्ये फुटबॉलसाठी एक मोठे ग्राऊंड तयार करण्यात आले आहे. स्विमिंग पूल, हेलीपॅड, जिम या सुविधासुद्धा येथे आहेत. या बंगल्याचे इंटेरिअर शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केले आहे. समुद्रकिनारी असणार्‍या या फार्म हाऊसमध्ये शाहरुख त्याच्या कुटुंबासोबत निवांत क्षण घालवत असतो. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये शाहरुखने येथेच त्याचा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या बर्थडे पार्टीत आलिया भट, रणबीर कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, शाहरुखच्या आलिशान फार्म हाऊसची इनसाइड छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...