आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूर ठरला ‘एशियन सेक्सिएस्ट मेन’, जाणून घ्या या यादीत कुणाकुणाची लागली आहे वर्णी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने सेक्सिएस्ट एशियन मेनचा किताब आपल्या नावी केला आहे.  युकेमधील 'द इस्टर आ' या वृत्तपत्राने सेक्सिएस्ट एशियन मेनची 2017 ची यादी जाहीर केली. त्यातील पहिल्या सहाजणांमध्ये भारतीयांचा समावेश आहे. या यादीत शाहिद कपूरने हृतिक रोशनला पछाडत हा किताब आपल्या नावी केला आहे.  


विशेष म्हणजे मागीलवर्षी याच यादीत शाहिद आठव्या स्थानावर होता. पण अवघ्या वर्षभरात त्याने पहिल्या स्थानावर झेप घेतली. तर हृतिक रोशन सलग तीन वर्षांपासून या यादीत दुस-या स्थानावर आहे. शाहिदने ट्वीट करुन आपला आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट केले, "Sexiest Man Alive, 2017!!! WOW!! Thank you guys!! It’s all made possible because of your love & support. Love you all!! Thanks @EasternEye & @AsjadNazir #AsjadNazirSexyList2017" 


शाहिदचा आगामी 'पद्मावती' हा चित्रपट वादात अडकला आहे. अद्याप त्याची रिलीज डेट निश्चित झालेली नाही. याशिवाय शाहिद 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाच्या चित्रीकरणात सध्या बिझी आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सेक्सिएस्ट एशियन मेनच्या यादीत शाहिद आणि हृतिक यांच्याव्यतिरिक्त आणखी कोणत्या भारतीय अभिनेत्यांची वर्णी लागली...  

बातम्या आणखी आहेत...