आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'रामायण'वर बीएमसीचा हतोडा, पाहा 57 कोटीच्या या बंगल्याचे फोटोज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुहू येथील बंगल्यावर बीएमसीची कारवाई झाली आहे. शत्रुघ्न यांनी केलेल्या अवैध बांधकामावरुन त्यांच्या या बंगल्याची तोडफोड करण्यात आली आहे. दोन टॉयलेट आणि पॅन्ट्री यावेळी तोडण्यात आल्या आहेत. याशिवाय शत्रुघ्न यांचे ऑफिस आणि इारतीतील मंदिरही अवैध असल्याचे सांगितले गेले आहे. अशी आहे शत्रुघ्न यांची संपत्ती...

 

शत्रुघ्न सिन्हा यांनी 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शत्रुघ्न यांनी त्यांची संपत्ती 131 कोटी सांगितली होती. शत्रुघ्न यांचे मुंबई, पुणे, दिल्ली, गुडगाव आणि पटना येथे एकूण 9 फ्लॉट्स आहेत. त्यांची किंमत जवळपास 25 कोटींपर्यंत आहे. मुंबईतील त्यांचा रामायण बंगल्याची किंमत 57 कोटी आहे. हा बंगला ते ऑफिस आणि घर दोन्ही म्हणून वापरतात. 1972 साली घेतलेल्या या बंगल्याची किंमत त्यावेळी 10 कोटी होती. या बंगल्यात सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई राहते. शत्रुघ्न यांची मुले लव-कुश यांचे पटनामध्ये 1.25 कोटींचे फ्लॅट्स आहेत. हे फ्ल़ॅटही घर आणि ऑफिस दोन्हीसाठी वापरले जाते. पुणे येथील वेअरहाऊसची किंमत पाच कोटी आहे. पत्नी पूनमची 15 कोटींची संपत्ती आहे. तसेच देहरादून येथील एका जमिनीची किंमत 60 लाख रुपये आहे. 

 

शत्रूघ्न यांना विविध कारची फार आवड आहे. त्यांच्याकडे 26,000 च्या अॅम्बॅसेटरपासून मर्सिटीज कारही आहे. त्यांच्याकडे मर्सिटीज, फॉर्च्युनर, कॅमरी, इनोव्हा, स्कॉर्पिओ, अॅकॉर्ड, होंडा सिटी यांसारख्या कार्सचे कलेक्शन आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शत्रुघ्य सिन्हा यांच्या तोडलेल्या बंगल्याचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...