आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मर्सिडिजने अपघात करणारा आदित्य जगतो असे आलिशान आयुष्य, बघा घराचे Inside Pics

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण ऑटो रिक्षाला टक्कर मारल्याप्रकरणी चर्चेत आला आहे. सोमवारी रात्री आदित्यने केलेल्या अपघातात रिक्षा चालक आणि रिक्षात बसलेली एक महिला प्रवासी जखमी झाली. जखमी महिलेला आदित्य नारायणने स्वत: रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी याप्रकरणी आदित्यवर कलम 279 आणि 338 अंतर्गत कारवाई करुन अटक केली होती. त्यानंतर 10 हजार रुपये भरुन त्याला जामिन मंजुर झाला. वरील छायाचित्रात लाल वर्तुळात दिसणा-या याच मर्सिडिज कारने आदित्यने अपघात केला. 

 

यापूर्वीही अडकला आहे वादात...

आदित्य नारायण गेल्या वर्षीही चर्चेत आला होता. वजनापेक्षा जास्त सामना घेऊन गेल्या प्रकरणी विमानतळावर आदित्यला एका अधिकाऱ्याने थांबवले होतं. नियामानुसार वजनापेक्षा जास्त सामान बाळगल्याने अधिकाऱ्याने आदित्यला अधिक पैसे भरण्यास सांगितले. या कारणावरून आदित्य भडकला होता आणि त्याने अधिकाऱ्यासोबत वाद घातला आणि धमकीही दिली होती. 


जगतो आलिशान आयुष्य... 
आदित्य हा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा एकुलता एक मुलगा आहे. आलिशान आयुष्य जगण्यासाठी आदित्य ओळखला जातो. अभिनेता, गायक, संगीतकार आणि होस्ट म्हणून आदित्यने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदित्यचे घर मुंबईत असून तो त्याचे आईवडील आणि आजीसोबत राहतो. आदित्यला बालपणापासूनच गायन आणि अभिनयाची आवड आहे. 1995 साली आलेल्या 'रंगीला' या सिनेमाद्वारे आदित्यने त्याच्या गायन आणि अभिनय करिअरची सुरुवात केली होती. 


आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला त्याच्या मुंबईतील घराची खास झलक दाखवत आहोत. आदित्यची आई नीता नारायण यांनी त्यांच्या या घराचे फोटोज आमच्यासोबत शेअर केले आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, आदित्यचे आईवडिलांसोबतचे फोटोज आणिआणि जाणून घ्या त्याच्याविषयी बरंच काही... 11 व्या स्लाईड्सपासून बघा आदित्यच्या घराचे Inside Photos... 

बातम्या आणखी आहेत...