आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2nd Wedding Anni: असिनने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा फोटो, बघा लग्नाचा Album

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री असिन आज तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे.  दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 19 जानेवारी 2016 रोजी असिन मायक्रोमॅक्सचा को-फाऊंडर राहुल शर्मा यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. दिल्ली येथे दोन पद्धतीने असिन आणि राहुल बोहल्यावर चढले होते. सकाळी सकाळी ख्रिश्चन पध्दतीने तर रात्री दोघांनी हिंदू पध्दतीने दोघांनी सप्तपदी घेतल्या होत्या.

 

असिन आणि राहुल आता एका मुलीचे आईबाबा झाले आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात असिनने मुलीला जन्म दिला. लग्नाच्या दुस-या वाढदिवसाच्या निमित्ताने असिनने पहिल्यांदाच तिच्या लेकीचा एक फोटो शेअर करुन लिहिले "#ARWedding #2years It's the three of us now. Stepping into the third year. Couldn't have asked for more!" तर राहुल शर्मा यांनीही ट्विटरवर त्यांच्या लग्नातील एक फोटो शेअर करुन ट्विट केले, "Today I celebrate the best decision I ever made #ARWedding #2yrs"


असिन आणि राहुल यांच्या लग्नाच्या दुस-या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात, कशी आहे असिन-राहुलची लव्हस्टोरी आणि यासह बरंच काही..

 

अशी आहे असिन-राहुलची लव्ह स्टोरी..

राहुल आणि असिन यांच्या लव्हस्टोरीतील खरा हीरो अभिनेता अक्षय कुमार आहे. अक्षयने जर दोघांची भेट घालून दिली नसती, तर ही स्टोरी कदाचित झालीच नसती. असिन व राहुल पहिल्यांदा 2012 मध्ये मुंबई एअरपोर्टवर भेटले होते. असिन तेव्हा एका टूर्नामेंटमध्ये 'हाउसफुल 2' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. अक्षय कुमारही तिच्यासोबत होता. यादरम्यान अक्षय कुमारने राहुलची असिनला ओळख करून दिली. अक्षय व राहुल चांगले मित्र आहेत. या टूर्नामेंटचे स्पॉन्सर राहुल शर्मा यांची कंपनी होती.

 

6 कोटींची रिंग देऊन राहुल यांनी असिनला केले होते प्रपोज
राहुल शर्मा यांनी आपल्या लेडी लव्हला फिल्मी स्टाइलमध्ये अर्थात गुडघ्यांवर बसून प्रपोज केले होते. बेल्जियमहून मागवलेली 20 कॅरेटची सॉलिटेयर रिंग देऊन राहुलने असिनला आपल्या भावना कळवल्या होत्या. या अंगठीचे बाजार मुल्य सहा कोटी रुपये आहे. अंगठीत बसवलेल्या हीर्‍याच्या खाली लव्हकपलचे इनीशियल्स AR (असिनचा A व राहुलचा R) मोनोग्राम बनवले होते.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, असिनचा Wedding Album.... आणि जाणून घ्या, लग्नात का घडला होता मेलोड्रामा...

बातम्या आणखी आहेत...