आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा पाटनीचे प्री-वेडिंग फोटोशूट, टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झालंय की काय!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत विवाहबद्ध झाली. अनुष्का पाठोपाठ 'रुस्तम' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत झळकलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिनेदेखील गुपचुप लग्न थाटल्याची बातमी आली. आता या अभिनेत्रींनंतर दिशा पाटनी हिलादेखील लग्नाचे वेध लागले की काय, हे तिचे लेटेस्ट फोटोज बघून म्हटलं जातंय. 

 

दिशा खरंच थाटणार आहे लग्न?
झालं असं, की 'एमएस धोनी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात करणा-या दिशा पाटनीचे प्री वेडिंग फोटोशूटचे फोटोज व्हायरल झाले आहेत. पण या फोटोशूटमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत नव्हे तर दुस-याच तरुणासोबत दिसतेय.  त्यामुळे दिशाचे टायगरसोबत ब्रेकअप झाले आणि ती दुस-याच तरुणासोबत लग्न थाटतेय, अशी चर्चा रंगू लागली. पण थांबा थांबा, दिशाने प्री वेडिंग फोटोशूट केलंय, हे खरे आहे, पण ते एका ब्रॅण्डसाठी केलेले एक व्यावसायिक फोटोशूट आहे. तिचे टायगरसोबत ब्रेकअप झाले नसून या शूटमध्ये दिसणारा हा तरुण एक मॉडेल आहे.

 

ब्राइडल कंपनीसाठी केले आहे फोटोशूट... 
दिशाने मुंबईस्थित ब्राइडेलन इंडिया कंपनीसाठी हे वेडिंग फोटोशूट केले आहे. वेडिंग स्टायलिंग दाखवण्यासाठी हे फोटोशूट करण्यात आले आहे. या फोटोशूटमध्ये दिशाने सब्ससाची यांच्या कलेक्शनमधील डिझायनर साडी परिधान केली आहे. दिशाचा अतिशय स्टनिंग लूक लक्ष वेधून घेतोय. एखाद्या नववधूसाठी स्वप्नवत असावे, असेच हे फोटोशूट आहे. 

 

कोण आहे दिशा पाटनी...
दिशाने एमएस धोनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय ती 'कुंग फू योगा' या चित्रपटातून हॉलिवूडचा सुपरस्टार जॅकी चॅनसोबत झळकली आहे. लवकरच ती टायगर श्रॉफसोबत 'बागी-2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिशा रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक ठिकाणी ही जोडी एकत्र दिसत असते. पण अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याची सार्वजिकरित्या कबुली दिलेली नाही. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, दिशा पाटनीच्या प्री-वेडिंग फोटोशूटची खास झलक... 

बातम्या आणखी आहेत...