आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: रेखा, प्रियांकासह या अॅक्ट्रेस दिसल्या साडीत, बघा विरुष्काच्या रिसेप्शनमधील अभिनेत्रींचा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्रा, सारा अली खान, कृती सेनन, रेखा, माधुरी दीक्षित - Divya Marathi
प्रियांका चोप्रा, सारा अली खान, कृती सेनन, रेखा, माधुरी दीक्षित

मुंबईः अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे दुसरे वेडिंग रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडले. लोअर परेलस्थित सेंट रेगिंस या पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य पार्टी रंगली. रिसेप्शनमध्ये अनुष्का स्लीवलेस लहेंगा चोलीत दिसली तर विराटने क्रिम कलरच्या ट्राऊजरसोबत नेव्ही ब्लू कोट घातला होता.

 

रेखा, प्रियांकासह या अभिनेत्री दिसल्या साडीत...

- विरुष्काच्या रिसेप्शन पार्टीत रेखा नेहमीप्रमाणे पारंपरिक साडीत अतिशय सुंदर दिसल्या. 

- प्रियांकानेदेखील या इव्हेंटसाठी साडीलाच पसंती दिली. गोल्डन कलरच्या साडीत प्रियांकाचा सिंपल लूक लक्ष वेधून घेणारा होता. 

- अभिनेत्री श्रीदेवीने ब्लू कलरची साडी परिधान केला होती. 

- याशिवाय कृती सेनन, माधुरी दीक्षित,कंगना रनोट या अभिनेत्रीसुद्धा रिसेप्शनमध्ये साडीत दिसल्या.

 

सैफ अली खानच्या मुलीचा दिसला ग्लॅमरस लूक..

- रिसेप्शनमध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान तिचा धाकटा भाऊ इब्राहिम अली खानसोबत पोहोचली. साराने डिझायनर लहेंगा परिधान केला होता. तिचा लूक लक्ष वेधून घेणारा होता. 

 

- भूमी पेडणेकर, आदिती राव हैदरी, सागरिका घाटगे यांनी डिझायनर ड्रेसेसला पसंती दिली. 


क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले एकत्र...
विरुष्काला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रिटी पोहोचले होते. अमिताभ बच्चन, रेखा, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, श्रीदेवी, करण जोहर, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, कंगना रनोट, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी, वीरेंद्र सहवाग, सौरभ गांगुली, अनिल कुंबळेसह अनेक बॉलिवूड आणि क्रिकेट सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, विरुष्काच्या रिसेप्शन पार्टीतील अभिनेत्रींचा लूक...

बातम्या आणखी आहेत...