आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​B\'day : मराठी उद्योजकासोबत समीराने थाटला आहे संसार, 4 वर्षांपूर्वी नव-याने असे केले होते प्रपोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिचा आज 37 वाढदिवस आहे. 14 डिसेंबर 1980 रोजी राजमुंदरी (आंध्र प्रदेश) येथे समीराचा जन्म झाला. तिचे वडील सी.पी. रेड्डी हे एक बिझनेसमन आहेत. समीराला दोन मोठ्या बहिणी आहेत. तिची थोरली बहीण मेघना रेड्डी एक यशस्वी व्हीजे आणि सुपरमॉडेल आहे. तर दुसरी बहीण सुषमा रेड्डीनेदेखील मॉडेलिंग सोबत सिनेमांमध्ये कामे केली आहेत. 


समीराने 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. 


मराठमोळ्या उद्योजकासोबत थाटला आहे समीराने संसार...
अडीच वर्षांच्या डेटींगनंतर समीराने 21 जानेवारी 2014 मध्ये मराठमोळा बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्नगाठ बांधली. अक्षय बाइकचा व्यवसाय करतो. 'वर्देंची मोटरसायकल' म्हणून अक्षयच्या बाइक्सला ओळखले जाते. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाइकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. या लग्नात समीरा आणि अक्षयच्या नातेवाईकांसोबत जवळचे मित्र सहभागी झाले होते. समीराच्या लग्नाचे प्लानिंग तिची बहीण सुषमाने केले होते. समीरा आणि अक्षय यांना एक दोन वर्षांचा मुलगा आहे. 


वाढदिवशी फिल्मी स्टाइलने अक्षयने केले होते समीराला प्रपोज..
आज वाढदिवसाच्या निमित्ताने समीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा एक फोटो शेअर करुन एक खास आठवण आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. चार वर्षांपूर्वी समीराच्या वाढदिवशीच अक्षयने तिला फिल्मी स्टाइलने लग्नाची मागणी घातली होती. समीराने लिहिले, "चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मी एंगेज्ड झाले होते. माझ्या वाढदिवसाची संध्याकाळ होती. आयुष्यातील एक वर्ष कमी झाल्याने मी थोडी अपसेट होते. त्यामुळे मी खूप वाईन प्यायली होती. मी घरी पोहोचले, तेव्हा अक्षय आणि संपूर्ण कुटुंब माझी वाट बघत असल्याचे मला समजले. माझ्या समोर एक मोठा बॉक्स ठेवण्यात आला. मी बॉक्स उघडताच त्यातून फुगे बाहेर आले आणि त्यावर एक रिंग दिसली. हे बघून मी खूप भावूक झाले होते. मी अक्षयचे प्रपोजल स्वीकारले. खरंच आयुष्यात असे सुंदर सरप्राइज मिळत असतात."  


पुढील स्लाईड्समध्ये पाहा, समीरा रेड्डी आणि अक्षय वर्देचा वेडिंग अल्बम... 

बातम्या आणखी आहेत...