आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मासिक पाळीच्या वेळी होतात हार्ट अटॅकसारख्या वेदना\', अभिनेत्रींनी शेअर केले अनुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार स्टारर 'पॅडमॅन' हा चित्रपट शुक्रवारी (9 फेब्रुवारी) रिलीज झाला आहे. या चित्रपटातून मासिक पाळीच्या वेळी महिलांना सामोरे जाव्या लागणा-या समस्यांना वाचा फोडण्यात आली आहे. मासिक पाळी हा स्त्रियांचा प्रश्न आहे, त्यांचे त्या बघून घेतील, अशी खरं तर समाजाची मानसिकता आहे. यावर बोलायला आजही महिला घाबरतात. पण या चित्रपटामुळे या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. सामान्य महिलांशिवाय बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा यावर मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे. 

 

तापसी पन्नू
'पिंक' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री तापसी पन्नू म्हणते, मुलांच्या तुलनेत मुली स्ट्राँग असतात. म्हणूनच मुली मासिक पाळीच्या काळात तीव्र वेदना सहन करु शकतात. तापसीने सांगितल्यानुसार, तिला मासिक पाळीच्या काळात हार्ट अटॅकसारख्या वेदना होतात. शूटिंगच्या काळात मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ती अनेकदा औषधे घेते. 


करीना कपूर
करीना कपूर मासिक पाळीविषयी म्हणते, की हा दार बंद करुन बोलण्याचा विषय नाही. मीडियाने यावर उघडपणे चर्चा घडवून आणायला हवी. महिलांसह पुरुषांनादेखील या विषयाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलीने मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना, जरीन खान यांचे मासिक पाळीविषयी काय आहे मत... 

बातम्या आणखी आहेत...