आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Celebrities Who Started Their Careers As Assistant Directors Before Their Debuts

रणबीरपासून हृतिकपर्यंत, या 10 Starsनी अभिनयापूर्वी पडद्यामागे केले आहे 'हे' काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः हृतिक रोशन, वरुण धवन आणि सोनम कपूर हे स्टार किड्स वडिलांच्या नावावर नव्हे तर स्वबळावर सुपरस्टार्स झाले आहेत. अभिनय स्किल्स दाखवण्यापूर्वी या कलाकारांनी पडद्यामागेही भरपूर काम केले आहे. पडद्यामागे चित्रपटाचे बारकावे समजून घेतले. सहायक दिग्दर्शक म्हणून या कलाकारांनी पडद्यामागे काम केले आहे.  आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच 10 स्टार्सविषयी सांगतोय, ज्यांनी प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी मोठ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केले. 


रणबीर कपूरने वडिलांना केले होते असिस्ट..
संजय लीला भन्साळींच्या 'सांवरिया' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेण्यापूर्वी अभिनेता रणबीर कपूरने वडील ऋषी कपूर यांना असिस्ट केले होते. ऋषी कपूर दिग्दर्शित 'आ अब लौट चले' या चित्रपटाचा रणबीर सहायक दिग्दर्शक होता. याशिवाय त्याने 'प्रेम ग्रंथ' आणि 'ब्लॅक' या चित्रपटांसाठीही सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.


हृतिक रोशन
2000 मध्ये वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकने बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घेतली होती.  चित्रपटात काम करण्यापू्र्वी हृतिकने वडिलांसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 'किंग अंकल' आणि 'कारोबार'सह अनेक चित्रपटांचा हृतिक असिस्टंट डायरेक्टर होता.


पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच आणखी 8 स्टार्सविषयी, ज्यांनी अभिनयापूर्वी केले होते सहायक दिग्दर्शक म्हणून काम...  

बातम्या आणखी आहेत...