आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बहिणीने ठेवली ईद पार्टी, ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या कतरिना-यूलिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानची बहीण अर्पिता खानने शनिवारी रात्री बांद्रा येथील आपल्या घरात ईदची पार्टी ठेवली. अर्पिताने नवरा आयुष शर्मासोबत ही पार्टी होस्ट केली. यावेळी अर्पिताने हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता तर आयुष मरुन कुर्त्यामध्ये दिसला. पार्टीमध्ये सलमान खान कॅज्यूअल लूकमध्ये दिसला. ईद पार्टीमध्ये कतरिना कैफ आणि यूलिया वंतूर ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या. दोघी लहेंग्यामध्ये गोर्जिअस दिसत होत्या. पार्टीमध्ये जॅकलीन फर्नांडिज, डेजी शाह, अनिल कपूर, अनुपम खेर, सोहेल खान, सीमा खान, अमृता अरोरा, हेलन, सुशीला चरक, शाकिब सलीम, सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, मौनी रॉय, हुमा कुरैशीसोबतच अन्य सेलेब्स सहभागी झाले. सलमानची बहीण अलवीरा खान आपला पती अतुल अग्निहोत्रीसोबत पार्टीमध्ये दिसली.


सलमानच्या घरी सेलिब्रेशन
- यापुर्वी सलमानच्या घरी म्हणजेच गॅलेक्सी अपार्टीमध्ये ईद सेलिब्रेट करण्यात आली. बी-टाउनचे अनेक सेलेब्स सलमानच्या घरी पोहोचले होते. एवढेच नाही तर सलमानने घराच्या बालकनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
- सलमानचे वडील सलीम खान यांनी मुलाखती दरम्यान स्वतः म्हणाले होते की, ईद म्हणजे सर्व काही विसरुन एकमेकांसोबत चांगले राहणे. माझ्या कुटूंबासाठी ईद असो किंवा दिवाळी सर्वच स्पेशल पध्दतीने साजरे केले जाते. ईदच्या दिवशी आम्ही रोजा सोडत असतो. यामुळे मिठाई आणि शेवाया बनवतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईदच्या पार्टीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...