आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Celebs Enjoy Christmas Festival: From Bharti Singh Salman Khan To Navya Naveli

कॉमेडियन भारतीपासून नव्या नवेलीपर्यंत, सेलिब्रिटींनी असा एन्जॉय केला Christmas

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिसमेस सेलिब्रेट करताना बॉलिवूड सेलिब्रिटी - Divya Marathi
ख्रिसमेस सेलिब्रेट करताना बॉलिवूड सेलिब्रिटी

मुंबईः बॉलिवूड सेलिब्रिटींनी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस जल्लोषात साजरा केला. कॉमेडियन भारती सिंहने लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस नव-यासोबत एन्जॉय केला. यावेळी भारतीचा नवरा हर्ष लिम्बाचिया तिला किस करताना दिसला. यासोबतच भारतीने तिचे लवी-डवी मोमेंट शेअर केले. 


कतरिनासोबत सलमानने केले सेलिब्रेशन... 

- यंदाच्या ख्रिसमसचे सेलिब्रेशन सलमानने कतरिनासोबत केले.
- दोघांनी केवळ व्हिडिओ नव्हे तर फोटोजसुद्धा शेअर करुन चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
- याशिवाय आलिया भटदेखील कतरिनासोबत मस्ती करताना दिसली.

 

अमिताभ बच्चन यांच्या नातीसह या सेलेब्सनी केले सेलिब्रेशन...
- बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा हिने हा सण आईवडील आणि भावासोबत साजरा केला.
- नव्याने एक फोटो शेअर केला असून यामध्ये ती आईवडील आणि भावासोबत पोज देताना दिसत आहे.

- सैफ-करीनाच्या चिमुकल्या तैमूरने फॅमिलीसोबत ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले.
- याशिवाय भूमी पेडनेकर, मीका सिंह, सोनाली बेंद्रे, दिशा पाटनी, करन जोहरची मुले यश-रूही, रणवीर सिंह, अनुपम खेर, क्रिस गेल, डायना पेंटीसह अनेक सेलिब्रिटींनी हा सण उत्साहात साजरा केला.

 

अक्षय-ट्विंकलने शेअर केला व्हिडिओ
- अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये दोघे ख्रिसमस ट्रीजवळ उभे होऊन डान्स करताना दिसत आहेत.
- दुसरीकडे वरुण धवन आणि कंगना रनोट यांनी गरीब मुलांसोबत हा सण साजरा केला. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, सेलेब्सच्या सेलिब्रेशनचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...