आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 51-कुणी 44 वर्षांपासून निभावताहेत एकमेकांची साथ, या आहेत बॉलिवूडच्या 11 यशस्वी जोड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांचा आज (11 डिसेंबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 95 वर्षे पूर्ण केली आहेत.1966 मध्ये ते अभिनेत्री सायरा बानो यांच्यासोबत लग्नगाठीत अडकले. तेव्हापासून हे दोघे एकमेकांची साथ निभावत आहेत. करिअर टॉपवर असताना या दोघांनी लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाला 51 वर्षे झाली आहेत. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे लग्न 11 ऑक्टोबर 1966 ला झाले होते. सायरा दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान आहेत. सायरा बानो वयाच्या 8 व्या वर्षापासून दिलीप कुमार यांच्याशी लग्नाचे स्वप्न पाहत होत्या. 1952 मध्ये रिलीज झालेला 'दाग' चित्रपट पाहिल्यानंतर त्या त्यांच्यावर फिदा झाल्या होत्या. ही जोडी बॉलिवूडच्या नवीन कपल्ससाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.  

 

जावेद अख्तर आणि शबाना आझमी
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी नुकताच लग्नाचा 34 वा वाढदिवस साजरा केला. 9 डिसेंबर 1984 रोजी या दोघांनी लग्न केले होते. शबाना आझमी या जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत. जावेद विवाहित असून दोन मुलांचे (फरहान आणि जोया) वडील होते. तरीदेखील शबाना यांचा जावेद यांचा जीव जडला होता. शबाना यांचे कुटुंबीय यांच्या लग्नाच्या विरोधात होते. परंतु त्यांनी ठाम निश्चय केला होता आणि जावेद यांच्याशी लग्न केले. ही जोडी आनंदाने आपले वैवाहिक आयुष्य जगत आहेत.  


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडच्या अशाच काही यशस्वी जोड्यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...