आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काजोलपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, गर्भपाताला सामोरे गेल्या आहेत या अभिनेत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री शिल्पा सकलानीने ती प्रेग्नेंट का राहू शकली नाही याचा खुलासा केला आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतरही ती प्रेग्नेंट राहू शकली नाही. ती म्हणाली की, ती प्रेग्नेंसीसाठी अनफिट होती. यामुळे तिला काही काळ प्रतिक्षा करण्यास सांगण्यात आली. यावर्षी मी बाळाचा विचार करु शकते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी प्रेग्नेंसीच्या काळात गर्भपाताचा सामना केला आहे. यामध्ये काजोल, शिल्पा शेट्टी आणि किरण रावचाही यामध्ये समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगणार आहोत. ज्या गर्भपाताला बळी पडल्या आहेत.


काजोल 
पती - अजय देवगण

लग्नाच्या काही दिवसांतच अभिनेत्री काजोलला मातृत्वाची चाहुल लागली होती. मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काजोल 2001 साली पहिल्यांदा गर्भवती राहिली होती. मात्र प्रेग्नेंसी पीरियडमध्ये त्रास झाल्याने तिचा गर्भपात झाला. त्यानंतर 20 एप्रिल 2003 रोजी काजोलने मुलगी न्यासाला जन्म दिला. न्यासाच्या जन्माच्या सात वर्षांनी काजोल दुस-यांदा आई झाली. 13 सप्टेंबर 2010 रोजी तिने मुलगा युगला जन्म दिला.

 

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

बिझनेसमन राज कुंद्रासोबत 2009 मध्ये लग्नागाठीत अडकल्यानंतर काही महिन्यांतच शिल्पा गर्भवती राहिली होती. मात्र तिचा गर्भपात झाला होता. त्यानंतर 21 मे 2012 रोजी शिल्पाने मुलगा वियानला जन्म दिला. दुस-या प्रेग्नेंसीच्या वेळी शिल्पाला साडे सात महिने इंजेक्शन्स घ्यावे लागले होते. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अशाच काही अभिनेत्रींविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...