आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्वेस्टर स्टेलॉनच्या निधनाची अफवा, या 17 स्टार्सच्याही मृत्यूचे पसरले होते खोटे वृत्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेते सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर वा-यासारखे पसरले आहे. ही अफवा पसरवणारे मानसिक रुपाने विक्षिप्त असल्याचे सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्या भावाने म्हटले आहे. 71 वर्षीय सिल्वेस्टर यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, "या मुर्खपणाकडे लक्ष देऊ नका. मी जिवंत असून आनंदी आणि आरोगी आहे." सिल्वेस्टर यांना रॅम्बो आणि रॉकी सीरिजच्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. ते आजही सिनेसृष्टीत अॅक्टिव असून अॅक्शनसाठी ओळखले जातात. 

 

तसं पाहता, सोशल मीडियावरुन यापूर्वीही अनेक दिग्गज कलाकारांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, कादर खान आणि गायक यो यो हनी सिंगसह अनेक सेलिब्रिटींच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या अफवांमुळे या सेलिब्रिटींच्या कुटुंबीयांना मनःस्ताप सहन करावा लागला होता.

 

लता दीदींच्या मृत्यूची पसरली होती अफवा... 
चार वर्षांपूर्वी गानकोकिळा लता मंगशेकर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी सर्वत्र पसरली होती. त्यानंतर स्वतः लतादीदींनी या अफवांना पूर्णविराम दिला होता. मी अगदी ठणठणीत असल्याचे दीदींनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होती. मी माझ्या निधनाचे वृत्त ऐकून हैराण झाले, असेही लता दीदींनी म्हटले होते. लता दीदींनी ट्विट केले होते, "नमस्कार मेरी तबियत के बारे में अफवाहें फैल रही हैं, पर आप सबका प्यार और दुआएं मेरे साथ हैं। मेरी तबियत बिल्कुल ठीक और और मैं स्वस्थ हूं।"

 

एक नजर टाकुया अशा काही सेलिब्रिटींवर ज्यांच्या मृत्यूची अफवा सोशल नेटवर्किंग साईट्सवर वा-यासारख्या पसरली होती....  

बातम्या आणखी आहेत...