आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरला असे मिळाले खिल्जीचे क्रूर रुप, पाहा INSIDE PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या बॉलिवूडमध्ये 'पद्मावती' चित्रपटांची सगळीकडे चर्चा आहे. संजय लीला भन्साळींचा हा राणी पद्मावतीच्या कथेवर आधारीत चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. या चित्रपटात राणी पद्मावती जितकी सुंदर दाखवण्यात आली. तितकेच क्रूर रुप खिल्जीचेही दाखवण्यात आले. रणवीर सिंहच्या वाट्याला ही खिल्जीची भूमिका आली आणि या भूमिकेसाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागली. परंतू तेवढीच मेहनत मेकअप, हेयर अँड प्रोस्थेटिक डिझायनर प्रीतिशील सिंहलासुध्दा करावी लागली. रणवीरला म्हणजेच 'खिल्जी' ला क्रूर रुप देण्याचे काम या महिलेने केलेय. ही जबाबदारी तिने चोखपणे पार पाडली. प्रीतिशीलने या चित्रपटासाठी शाहिद कपूर आणि दीपिका पादूकाणचाही मेकअप केला आहे. ती म्हणते की, भन्साळी सरांसोबत काम करताना आपल्याला खुप जास्त मेहनत करावी लागते. काही दिवसांपुर्वी शाहिद कपूर आणि रणवीरचे मेकअप रुममधील फोटोज समोर आले होते. आता हे नवीन फोटो समोर आलेय. 

 

- प्रीतिशीलने या भूमिकांच्या लुकचा खुप अभ्यास केला. यापुर्वी प्रीतिशीलने भन्साळींसोबत बाजीराव मस्तानीमध्येही काम केलेय. 


- फिल्म नान शाह फकीरसाठी प्रीतिशीलला बेस्ट मेकअपरचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 
- यानंतर ती अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर स्टारर 102 नॉट आउटमध्ये दिसणार आहे तिचा मेकअप पाहायला मिळणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणवीरचे हे नवीन फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...