आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'इलास्टिक\' झाला \'लव्ह आज कल\', \'सिंपली खान\'चे झाले \'माय नेम इज खान\', या 20 फिल्मचे बदलले Title

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावत' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 10 दिवसांत तब्बल 176 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंह, आदिती राव हैदरी या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. पण रिलीजपूर्वी या चित्रपटावरुन चांगलेच वादंग उठले होते. चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी राजपूत करणी सेनेने शर्थीचे प्रयत्न केले होते. पण सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल सुचवत चित्रपटाच्या रिलीजला ग्रीन सिग्नल दिला.  


बदलण्यात आले होते चित्रपटाचे शीर्षक
'पद्मावत' चित्रपटाचे प्रदर्शन करणी सेना आणि इतर काही संघटनांकडून होणारा निषेध, भन्साळी आणि दीपिकाला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि एकंदर बिघडलेली परिस्थिती पाहता चित्रपट 1 डिसेंबर 2017 ऐवजी  25 जानेवारी 2018 रोजी रिलीज झाला. रिलीजपूर्वी सेन्सॉरने चित्रपटाचे शीर्षक 'पद्मावती'वरून 'पद्मावत' करण्यास सांगितले होते. 


यापूर्वीही अनेक चित्रपटांचे बदलण्यात आले आहेत शीर्षक 
केवळ 'पद्मावत'च नव्हे तर यापूर्वीही कधी सेन्सॉर बोर्डाच्या सांगण्यावरुन तर कधी निर्माता-दिग्दर्शक-कलाकारांना चित्रपटाचे शीर्षक आवडले नसल्याने त्यात बदल झाले आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला यापूर्वी कोणकोणत्या चित्रपटांच्या शीर्षकात बदल करण्यात आले, याची खास माहिती देत आहोत. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या चित्रपटांच्या शीर्षकात यापूर्वी करण्यात आला आहे बदल...

बातम्या आणखी आहेत...