आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या 'जलसा'पासून ते SRK च्या पहिल्या फ्लॅटपर्यंत, ही आहे स्टार्सच्या घरामागची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मायानगरी मुंबईत स्वतःचे घर असणे हे स्वप्नवतच आहे. मुंबई बॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्ससाठी ओळखली जाते. अनेक अभिनेते आजही येथे भाड्याच्या घरात राहतात. तर काही सेलिब्रिटींचे मात्र येथे एकापेक्षा अधिक घर आहेत. पण अनेक सेलिब्रिटी आज ज्या घरात वास्तव्याला आहेत, तेथे पूर्वी दुसरे स्टार्स वास्तव्याला होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? उदाहरणार्थ अमिताभ बच्चन आज ज्या घरात राहतात, तेथे 70 च्या दशकात फिल्ममेकर एन. सी. सिप्पी राहात होते. 


अमिताभ बच्चन यांना भेट स्वरुपात मिळाला 'जलसा'...
- बिग बी आपल्या संपूर्ण कुटुंबासह 'जलसा' या बंगल्यात राहतात.  मीडियात आलेल्या वृत्तानुसार, जलसा हा बंगला दिग्दर्शक राज एन सिप्पी (एन सी सिप्पी यांचा मुलगा) यांनी अमिताभ बच्चन यांना भेट स्वरुपात दिला होता. पण अमिताभ बच्चन यांनी या वृत्ताचे खंडन केले होते.
- आणखी एका रिपोर्टनुसार, हे घर त्यांनी सत्तरच्या दशकात दिग्दर्शक एन. सी. सिप्पी यांच्याकडून खरेदी केले होता. यापूर्वी बच्चन कुटुंब 'प्रतिक्षा' या बंगल्यात वास्तव्याला होते. आज कोटींच्या घरात किंमत असलेला 'जलसा' हा बंगला बिग बींनी किती रुपयांत खरेदी केला होता, हे उघड झालेले नाही. 


बिग बींपासून ते शाहरुख खान, आमिर खान या स्टार्सचे आलिशान बंगले खूप प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांनी त्यांचे हे बंगले कुणापासून खरेदी केले, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्यांच्या या बंगल्यांची किंमत आज कोटींच्या घरात आहे.  पुढे वाचा, शाहरुख खानपासून सोनू सूद, बिपाशा बसूपर्यंत कोणत्या सेलिब्रिटीने कुणाकडून खरेदी केले त्यांचे स्वप्नातील घर...

बातम्या आणखी आहेत...