आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त Star Kids : रेप केसमध्ये अडकला मिथून दांचा मुलगा, रेव्ह पार्टीत सापडली होती आदित्य पंचोलीची मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या मुलांची नावे वादात सापडली आहेत. कुणाच्या मुलावर बलात्काराचा आरोप आहे, तर कुणाच्या मुलावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा. काही कलाकारांची मुले रेव्ह पार्टीत देखील सापडली.

 

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला वादात अडकलेल्या काही स्टार किड्सविषयी सांगत आहोत. 

 

रेप केसमध्ये अडकला आहे मिथून चक्रवर्तींचा मुलगा...
सुरुवात करुयात अलीकडेच बलात्काराच्या आरोपात अडकलेल्या मिमोह चक्रवर्तीपासून. मिमोह हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा मुलगा आहे.  मिमोह आणि त्याची आई योगीता बाली सध्या अडचणीत आले आहेत. मिमोहवर बलात्कार आणि योगिता बालींवर जबरदस्ती गर्भपाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका भोजपुरी अभिनेत्रीने हे आरोप लावले आहेत. मिमोहने लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. लग्नाचं आश्वासन देत त्याने संबध निर्माण केले. यातूनच ती अभिनेत्री गर्भवती राहिली तेव्हा योगिता बालीने तीला गर्भपात करण्यास भाग पाडले असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. सध्या जामीनावर बाहेर असलेला मिमोह अलीकडेच दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसासोबत लग्नगाठीत अडकला आहे. सध्या दोघेही कॅलिफोर्नियात हनीमून साजरा करत आहेत. 

 

रेव्ह पार्टीत सापडली होती आदित्य पांचोली-जरीना वहाबची मुलगी... 
आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव सूरज तर मुलीचे नाव सना आहे. खास गोष्ट म्हणजे आदित्यची ही दोन्ही मुले वादात अडकली आहेत. पहिले बोलुयात सनाविषयी. 2008 साली एका रेव्ह पार्टीत सना सापडली होती. 


कुठे रंगली होती ही रेव पार्टी... 
- रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील क्लब बॉम्बे 72 डिग्री ईस्टमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीत सना आढळली होती.
- अँटी नारकोटिक्स टीमने येथे धाड घातली होती.  

- या घटनेनंटर सनाने म्हटले होते, 'पबमध्ये माझ्याशिवाय आणखी  200 लोक उपस्थित होते. माझे नाव माझ्या आडनावामुळे हायलाइट झाले. माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. याप्रकरणी माझ्या आईवडिलांना त्रास देण्यात आला. त्यामुळे मी खूप दुःखी झाले आहे.'  
- सनाला 2007 साली रिलीज झालेला 'शाकालाका बूम बूम' हा सिनेमा ऑफर झाला होता. पण सिनेमात सना एक्सपोज करायला तयार नव्हती, त्यामुळे तिने ही ऑफर नाकारली होती. नंतर हा सिनेमा कंगना रनोट ऑफर झाला होता.  
- लॉस एंजिलिसमधून शिक्षण पूर्ण करणारी सना आता गोव्यात एक इटॅलिअन रेस्तराँ चालवते.


पुढे वाचा, आदित्यच्या मुलावर आहे गर्लफ्रेंडला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप...

 

बातम्या आणखी आहेत...