आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B’day: या आहेत नसीरुद्दीन शाह यांच्या दुस-या पत्नी, शाहिद कपूरच्या सावत्र आईची आहे सख्खी बहीण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी रत्ना पाठक, मुले विवान, ईमाद, मुलगी हिबासोबत नसीरुद्दीन शाह - Divya Marathi
पत्नी रत्ना पाठक, मुले विवान, ईमाद, मुलगी हिबासोबत नसीरुद्दीन शाह

बॉलिवूडचे प्रख्यात अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज  69 वा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये 20 जुलै 1949 रोजी झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नसीर यांनी अलीगढ विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचे धडे घेतल्यानंतर नसीर यांनी हिंदी सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. 


पहिले लग्न ठरले अपयशी, रत्ना पाठकसोबत थाटला दुसरा संसार....
नसीर यांचे पहिले लग्न वयाच्या 20व्या वर्षी झाले होते. त्यांची पहिली पत्नी मनारा सिकरी उर्फ परवीन मुराद या त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या होत्या. पण वर्षभरदेखील दोघांचे लग्न टिकले नाही. पहिल्या लग्नापासून नसीर यांना एक मुलगी असून तिचे नाव हिबा आहे.  


स्वतःपेक्षा वयाने 14 वर्षांनी लहान तरुणीशी केले नसीर यांनी दुसरे लग्न... 
पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर नसीर यांनी रत्ना पाठक यांच्यासोबत दुसरे लग्न केले. रत्ना गुजरातच्या प्रसिध्द अभिनेत्री दीना पाठक यांच्या कन्या आहेत. गुजरातचे जावई बनलेले नसीर दुस-या लग्नाच्या वेळी 13 वर्षांच्या मुलीचे वडील होते. रत्ना नसीर यांच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहेत.  


कसे पडले रत्ना यांच्या एकमेकांच्या प्रेमात? 
नसीरुद्दीन यांच्यासोबतच्या नात्याविषयी रत्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, 'आमची पहिली भेट नाट्यकार सत्यदेव दुबे नावाच्या 'संभोग से संन्यास तक'च्या सरावादरम्यान झाली होती. पहिल्या भेटीत आम्हाला एकमेकांप्रती कोणतेही आकर्षण नव्हते. परंतु काही महिने एकत्र काम केल्याने आम्ही जवळ आलो.'


पुढे वाचा,  नसीरुद्दीन यांच्या लेकीने केला रत्नाचा आई म्हणून स्वीकार... 

 

बातम्या आणखी आहेत...