आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र भावाला भेटायला 83 हजारांचे बूट घालून पोहोचली जान्हवी, टीशर्टची होती एवढी किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरच्या पहिल्यावहिल्या धडक या बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सध्या मुंबईत चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे. शूटिंग संपल्यानंतर आता जान्हवी कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. आई श्रीदेवीच्या निधनानंतर तिचे सावत्र भाऊ अर्जुन आणि बहीण अंशुलासोबतचे नाते सुधारले आहे. अधूनमधून ती त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असते. मंगळवारीसुद्धा जान्हवी वडील बोनी कपूर यांच्यासोबत अर्जुनच्या घरी डीनरसाठी गेली होती. यावेळी जान्हवी पिंक प्रिंटेड टीशर्ट, ब्लू रिप्ड जीन्स आणि Gucci ब्रॅण्डचे बुट घालून दिसली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तिच्या या टीशर्ट आणि बुटांची किंमत तब्बल दीड लाख रुपये होती. 


जान्हवीने घातले होते 83 हजारांचे बुट...  
- जान्हवीने घातलेल्या  Gucci ब्रॅण्डच्या पिंक टीशर्टची किंमत $950 म्हणजेच 63,597 रुपये आहे.
- तर तिने Gucci ब्रॅण्डचेच ब्लॅक कलरचे लेदर शूज घातले होते. त्याची किंमत टीशर्टपेक्षाही अधिक म्हणजे $1,248 अर्थातच 83,272 रुपये आहे. एकंदरीतच जान्हवीच्या या अटायरची किंमत 1,46,869 रुपये आहे.
- श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी आणि खुशी यांचे सावत्र भाऊ अर्जुनसोबतचे बाँडिंग चांगले झाले आहे.
- बातम्यांनुसार, अर्जुन त्याच्या तिन्ही बहिणी-अंशुला, जान्हवी आणि खुशी कपूरसोबत लंडनमध्ये सुटी एन्जॉय करण्याचे प्लानिंग करतोय.


पुढील स्लाईड्सवर बघा, वडील बोनी कपूर यांच्यासोबतचे जान्हवी कपूरचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...