आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sridevi गेल्यानंतर थांबले आहे आमचे आयुष्य, बोनी कपूर यांनी व्यक्त केल्या भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू याच वर्षी 24 फेब्रुवारीला झाला होता. श्रीदेवीचे कुटूंब अजूनही त्यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेले नाही. श्रीदेवी गेल्यानंतर नवरा बोनी कपूर यांनी पहिली मुलाखत दिली. त्यांनी सांगितले की, श्रीदेवी गेल्यानंतर आमचे आयुष्य पुर्णपणे बदलले आहे. ते म्हणाले, श्रीदेवी गेल्यानंतर माझ्या दोन्ही   मुलींची सर्वात मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मी खुशी आणि जान्हवी दोन्हींसाठी आई आणि बाबा या दोन्हीही भूमिका निभावण्याचा प्रयत्न करतोय.

 

वाईट होता काळ
- बोनीने एका एन्टटेन्मेंड पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, श्रीदेवी अचानक आयुष्यातून गेली. यानंतरचा काळ खुप कठीण होता. श्रीदेवी गेल्यानंतर आमचे आयुष्य थांबले आहे. 
- ते म्हणाले की, अशा अनेक गोष्टी होत्या ज्या आम्ही एकमेकांना सांगू शकलो नव्हतो. 
- आता आम्ही आमचे आयुष्य पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय. यासोबतच मी माझ्या मुलांकडेही पुर्ण लक्ष देतोय. 
- ते म्हणाले की, आयुष्यात अजूनही काही गोष्टी अडकलेल्या आहेत. श्रीदेवी आमच्यासोबत नाही यावर अजूनही विश्वास बसत नाहीये, मला माझे आयुष्य एकटेच काढायचे आहे.
- श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट 'झिरो' हा आहे. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी रिलीज होईल. शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा स्टारर या चित्रपट श्रीदेवीचा कॅमिओ आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...