आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Engagement: एका महिन्याच्या आत \'बॉयफ्रेंड\' निक जोनाससोबत साखरपुडा करणार प्रियांका, ग्लॅमर मॅगझीनचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा सध्या निक जोनाससोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. ती लवकरच अमेरिकी सिंगर निक जोनाससोबत साखरपुडा करणार आहे. ग्लॅमर मॅगझीन फिल्मफेअरने हा दावा केला आहे. मॅगझीननुसार, प्रियांकाने निक जोनाससोबत आपले नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टमध्ये अॅक्ट्रेसच्या जवळच्या सोर्सचा दाखला देऊन लिहिले आहे की, "जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये प्रियांका निक जोनाससोबत इंगेजमेंट करणार आहे. साखरपुडा फिक्स करण्यासाठीच प्रियांका जोनाला आपल्या कुटूंबीयांना भेटवण्यासाठी भारतात घेऊन आली आहे." परंतू याविषयी काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत प्रियांका आणि निक...
- सध्या प्रियांका निकसोबत गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. तिच्यासोबत भाऊ सिध्दार्थ आणि कजिन परिणीती चोप्राही गेली होती. आता परिणीती मुंबईमध्ये परतली आहे. 22 जूनला निक प्रियांकासोबत भारतात पोहोचला आहे. यानंतर प्रियांका आणि तिची आई मुधी चोप्रासोबत मुंबईच्या एका रेस्तरॉमध्ये डिनरसाठी पोहोचले होते. एवढेच नाही तर, शनिवारी प्रियांकाने जुहू येथील आपल्या प्लॅटमध्ये हाउसवार्मिंग पार्टीही दिली होती. यामध्ये आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रासोबतच तिचे अनेक फ्रेंड्स सहभागी होते.


प्रियांकाची आई म्हणाली होती, अजून निकविषयी मत सांगणे घाई होईल
- प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांना शुक्रवारी निक विषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी पहिल्यांदाच निकला भेटले. आम्ही भेटलो तेव्हा 10 लोक सोबत होते. त्यांच्यासमोर निकसोबत जास्त बोलता आले नाही. त्याच्याविषयी काही मत सांगणे खुप घाई होईल.

 

बातम्या आणखी आहेत...