आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Celebrity Numerologist Sanjay Jumani Reveals Change In Name Benefit Sonam Kapoor न्युमरोलॉजिस्टच्या सांगण्यावरुन सोनम कपूरने पुन्हा बदलले आपला नाव

न्युमरोलॉजिस्टच्या सांगण्यावरुन सोनम कपूरने पुन्हा बदलले आपला नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः  पहिले सोनम कपूर... नंतर सोनम कपूर आहुजा आणि आता सोनम के. कपूर... होय नववधू सोनम कपूरने पुन्हा एकदा आपल्या नावात बदल केला आहे. सोनमने लग्नाच्या दिवशी म्हणजे  8 मे रोजी सोशल मीडियावर स्वतःचे नाव बदलून सोनम कपूर आहुजा केले होते. पण सेलिब्रिटी न्युमरोलॉजिस्ट संजय जुमानी यांच्या सल्ल्यानंतर सोनमने स्वतःच्या नावात बदल करुन ते आता 'सोनम के आहुजा' असे केले आहे.


संजय जुमानींनी सांगितल्यानुसार, सोनम कपूर आहुजा असे पूर्ण नाव लिहिल्याने सोनमच्या आयुष्यात अनेक चढउतार  येऊ शकतात. मात्र सोनम के आहुजा या नावाने तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम घडेल. 


न्युमरोलॉजीवर आहे आनंदचा विश्वास...
संजय जुमानींनी सांगितल्यानुसार, सोनमचे पती आनंद आहुजा यांचा न्युमरोलॉजीवर विश्वास आहे. आनंदला बास्केटबॉल खेळणे पसंत आहे आणि यासाठी ते न्युमरोलॉजिस्टचा सल्ला घेत असतात. संजय जुमानींनी पुढे सांगितले, की आनंद यांना जेव्हा  बास्केटबॉलसाठी जर्सीचा नंबर घ्यायचा होता, तेव्हा त्यांनी त्यांच्याच सल्ला घेतला होता. संजय जुमानी आनंद यांना 24 किंवा 33 नंबर घेण्याचा सल्ला दिला होता. 


पुढील स्लाईड्सवर बघा, सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे निवडक फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...