आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पद्मावत'ची झाली 166.50 कोटींची कमाई, बघा Lavish सेटचे 22 Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावत' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. अनेक वादांनंतर 25 जानेवारी रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि त्याने आतापर्यंत भारतात 166.50 कोटींची कमाई केल्याचे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट केले आहे.


चित्रपटाची कमाई

24 जानेवारी  बुधवार 5 कोटी (पेड प्रीव्ह्यू)
25 जानेवारी गुरुवार 19 कोटी
26 जानेवारी  शुक्रवार  32 कोटी
27 जानेवारी शनिवार  27 कोटी
28 जानेवारी  रविवार  31 कोटी 
29 जानेवारी  सोमवार 15 कोटी 
30 जानेवारी  मंगळवार 14 कोटी
31 जानेवारी बुधवार  12.50 कोटी
01 फेब्रुवारी गुरुवार  11 कोटी

 

चित्रपटाचे लॅव्हिश सेट
संजय लीला भन्साळी त्यांच्या चित्रपटांमधील लॅव्हिश सेटसाठी ओळखले जातात. 'पद्मावत' चित्रपटात भव्य सेट पाहायला मिळतात. हा चित्रपट एक पीरियड ड्रामा मूव्ही आहे, ऐतिहासिक मंदिर आणि महाल दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हा चित्रपट 35 कोटींच्या 35 सेटवर शूट करण्यात आला. चित्रपटाच्या प्रॉडक्शन डिझायनर सुब्रता चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी टीमसोबत मिळून फिल्मसाठी 35 सेट तयार केले होते. सुब्रता यांना अमित रेनेसुध्दा असिस्ट केले आहे. सुब्रता यांनी सांगितले की, हा सेट आम्ही फिल्मसिटीमध्ये जवळपास 1 एकर एरियामध्ये तयार केला होता.

 

फिल्मसिटीत तयार झाले 35 कोटींचे 35 सेट्स... 

सुब्रता यांनी सांगितल्यानुसार, फिल्मसिटीमध्ये तयार केलेल्या 35 सेट्समध्ये चित्तोडचा किल्ला (राजा रतन सिंह आणि राणी पद्मावतीचे घर), शिव मंदिर (येथे राणी पूजा करते.), दिल्ली दरबार (अलाउद्दीन खिल्जीचे घर), जंगल, गुहा, जलालुद्दीन खिल्जीचे घर इत्यादी बनवले होते. चित्तोडचा किल्ला बनवण्यासाठी आम्ही अजंठा, वेरुळ, महाबलीपुरमच्या आर्किटेक्चरकडून प्रेरणा घेतली. कैलाश मंदिर डोळ्यांसमोरठेवून शिव मंदिर बनवले. अलाई दरवाजा लक्षात ठेवून खिल्जीचा दिल्ली दरबार तयार केला. हा लॅव्हिश सेट तयार करण्यासाठी 50 दिवस लागले. तर लहान-लहान डिझाइन बनवण्यासाठी 20 दिवस लागले होते.

 

खिल्जीचे सिंहासन तयार करणे नव्हते सोपे
अलाउद्दीन खिल्जीचे सिंहासन तयार करण्यात खुप काळ लागला. सुब्रता यांनी सांगितले, या सिंहासनला भन्साळींचे अप्रूव्हल मिळण्यासाठी खुप काळ लागला. त्यांना सिंहासनचा लुक एकदम डिफरेंट हवा होता. आमच्या टीमने भन्साळींना विश्वास दिला, की, आम्ही त्यांना रियल वाटेल असेच सिंहासन तयार करुन देऊ. हे फायबरऐवजी लाकडाने तयार केले होते. हे बनवण्यासाठी 20 दिवस लागले.

 

कोल्हापुरातही झाले शूटिंग 
रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट फिल्मसिटीऐवजी दोन रिअल लोकेशनवर शूट करण्यात येणार होता. सुब्रता यांनी सांगितले की, काही सीन्सची शूटिंग अबू धाबीमध्ये करण्याची प्लानिंग होती. परंतू काही कारणास्तव हे सीन्स कोल्हापुरमध्ये शूट करण्यात आले. काही सीन्स जयगढ किल्ल्यावर शूट करण्यात आले. येथे खिल्जीची सेना नमाज पठन करताना दाखवण्यात आली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, 'पद्मावत'च्या सेटचे 21 फोटोज...

बातम्या आणखी आहेत...