आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांच्या शिरीषने 32 वर्षांच्या फराहला केले होते प्रपोज, शाहरुख-गौरीने केले होते कन्यादान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फराह खानच्या संगीत आणि लग्नाचे फोटो - Divya Marathi
फराह खानच्या संगीत आणि लग्नाचे फोटो


बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खान आणि शिरीष कुंदर आज त्यांच्या लग्नाचा 13 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 9 डिसेंबर 2004 रोजी फराह तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदरसोबत लग्नगाठीत अडकली होती. दाक्षिणात्य आणि मुस्लिम पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज केले होते. तर दाक्षिणात्य पद्धतीने झालेल्या लग्नात गौरी आणि शाहरुख खान यांनी फराहचे कन्यादान केले होते. त्यानंतर दोघांनी निकाह केला होता. 

 

फराह आणि शिरीष यांच्या लग्नाला शाहरुख खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. गेल्यावर्षी लग्नाच्या 12 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फराहने तिच्या लग्नाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. फराहने शेअर केलेल्या संगीत सोहळ्याच्या फोटोत बी टाऊन कलाकारांनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अभिनेता शाहरुख खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी प्रियांका चोप्रा या कलाकारांचेही फोटो यामध्ये दिसत आहेत.

 

अशी सुरु झाली होती शिरीष आणि फराहची प्रेमकहाणी... 
'मैं हू ना' या चित्रपटाच्या सेटवर शिरीष आणि फराह यांचे प्रेम फुलले होते. शाहरुखच्या घरी झालेल्या मैं हू ना या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत फराहने तिच्या मित्रमंडळींसमोर शिरीषवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. मैं हू ना या चित्रपटाची फराह दिग्दर्शिका तर शिरीष एडिटर होता. विशेष म्हणजे शिरीषचे फराहवर एकतर्फी प्रेम होते. तिच्यावरच्या प्रेमापोटी तो कमी पैशांत मैं हू नाच्या एडिटिंगसाठी तयार झाला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर शिरीषने फराहकडे त्याच्या प्रेमाची कबुली दिली.फराहसुद्धा हळूहळू त्याच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. शिरीषने फराहला प्रपोज केले तेव्हा तो 25 वर्षांचा तर फराह 32 वर्षांची होती. या दाम्पत्याला तिळी मुले आहेत.  


पुढील स्लाईड्सवर बघा, फराह आणि शिरीष यांच्या लग्नाचा अल्बम.... 

बातम्या आणखी आहेत...