आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकोसा योगायोग : श्रीदेवींच्या \'हिम्मतवाला\'ला आजच पूर्ण झालीत 35 वर्षे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - काही व्यक्ती या आपल्यातून कधीही जायला नको असे वाटत असते. पण नेमक्या अशाच काही व्यक्ती फार लवकर जीवनाच्या रंगमंचावरून एक्झिट घेत असतात. असेच काहीसे घडले ते श्रीदेवीच्या बाबतीत. विशेष म्हणजे कोणच्याही आयुष्यात येऊ नये असा एक योगायोग श्रीदेवींच्या मृत्यूशी संलग्न झाला आहे. 


आजच्याच दिवशी रिलीज झाला होता हिम्मतवाला
श्रीदेवी यांनी ज्युली या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता सोलवा सावन. त्यानंतर कमल हसन बरोबर तिचा सद्मा चित्रपट ती किती सशक्त अभिनेत्री आहे हे दाखवणारा ठरला. पण श्रीदेवी बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने पाय रोवले ते हिम्मतवाला चित्रपटाने. या चित्रपटाशी संबंधित एक योगायोग श्रीदेवीच्या मृत्यूशी जुळून आला आहे. हा योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी 1983 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. पण या चित्रपटाला आज 35 वर्षे पूर्ण होत आहेत. नेमकी याच दिवशी श्रीदेवीच्या जाण्याची बातमी येणे म्हणजे हा नकोसा असलेला असाच योगायोग आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हिम्मतवाला चित्रपटातील काही PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...