आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः 'इश्क', 'सुहाग', 'देवदास', 'वन्स अपॉन टाइम इन मुंबई', 'दिल है की मानता नहीं' यासह 200 हून अधिक चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते टीकू तलसानिया आता बॉलिवूडपासून दूर आहेत. अखेरचे ते 'सजन रे फिर झूठ मत बोलो' या विनोदी मालिकेत झळकले होते. आता टीकू यांची मुलगी शिखा तलसानिया हीदेखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. करीना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्यासोबत शिखा 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात लीड रोलमध्ये झळकत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये शिखाचे अनेक बोल्ड डायलॉग्स आहेत. 'वीरे दी वेडिंग' हा तिला मिळालेला मोठा ब्रेक आहे.
- शिखाने आपल्या करिअरची सुरुवात कॅमे-यामागे केली. तिने केवळ सेलिब्रिटी मॅनेजर म्हणूनच नव्हे तर फ्लोर आणि लाइन प्रोड्युसर म्हणूनदेखील काम केले आहे.
- शिखाने 'वीरे दी वेडिंग'पूर्वी अनेक चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. 'दिल तो बच्चा है जी', दीपा मेहतांच्या 'मिडनाइट चिल्ड्रन', कल्की कोचलिनच्या 'माय फ्रेंड पिंटो' आणि रणबीर कपूरच्या 'वेक अप सिद' या चित्रपटांमध्ये साइड रोल्समध्ये झळकली आहे.
- 'झलक दिखला जा' आणि 'इंडियन आयडॉल-3' या रिअॅलिटी शोच्या पोस्ट प्रॉडक्शन टीममध्ये काम केले.
लठ्ठपणाविषया लोकांचे विचार बदलू इच्छिते शिखा...
- शिखा बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींप्रमाणे स्लिमट्रीम नसून लठ्ठ आहे.
- लठ्ठपणाविषयी ती लोकांचे विचार बदलू इच्छिते. अभिनयाचा लठ्ठपणाशी काहीही संबंध नसल्याचे ती सांगते. शिखाला प्लस साइज अॅक्ट्रेस म्हणून अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करायचे आहे.
- भविष्यात शिखाला एक टॉक शोसुद्धा होस्ट करायचा आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, टीकू तलसानिया यांची लेक शिखाचे PHOTOS...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.