आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात कास्टिंग काऊचविषयी आपलं मत स्पष्ट केलंय. त्या म्हणाल्या, ‘या सर्व गोष्टी (कास्टिंग काऊच वगैरे) कित्येक वर्षांपासून सुरुच आहेत. प्रत्येक मुलीवर कोणीतरी बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. सरकारचे लोकही यात मागे नाहीत. पण, मग तुम्ही या चित्रपटसृष्टीलाच का दोष देताय? याच चित्रपटसृष्टीमुळे अनेकांचा उदनिर्वाह होतो. कमीत कमी ती बलात्कार करुन सोडून तर देत नाही.’. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कास्टिंग काऊचविषयी बोलताना त्यांनी यामध्ये मुलींवरही काही गोष्टी अवलंबून असतात असं म्हणत सर्वाचं लक्ष वेधलं. ‘काय करायचंय आणि काय नाही हे मुलींच्या हातात असतं. तुमच्याकडे कला आहे तर मग स्वत:ला दुसऱ्यांच्या स्वाधीन का करता, स्वत:ला का विकता’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या या वक्तव्यातून चित्रपटसृष्टीला दोष देणाऱ्यांवर त्यांनी आगपाखड केल्याचं दिसून आलं आहे.
69 वर्षीय सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये नृत्य दिग्दर्शिका म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तब्बल दोन हजारांहून अधिक गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली आहेत. वयाच्या तिस-या वर्षीपासून त्या सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. जाणून घेऊयात, त्यांच्या खासगी आयुष्याविषयी...
फाळणीनंतर भारतात आले सरोज खान यांचे कुटुंब..
22 नोव्हेंबर 1948 रोजी किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल आहे. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले होते. वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी बालकलाकार म्हणून 'नजराना' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
वयाच्या अवघ्या 13 वर्षी अचानक झाले होते सरोज यांचे लग्न...
सरोज खान यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत 43 वर्षीय डान्स मास्टर बी सोहनलालसोबत लग्न केले होते. सरोज यांच्यापेक्षा वयाने 30 वर्षे मोठे असलेल्या सोहनलाल यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांना पहिल्या लग्नापासून चार मुले होती. एका मुलाखतीत सरोज यांनी सांगितले होते, वयाच्या 13 वर्षी मी शाळेत जात होती. त्यावेळी लग्नाचा अर्थसुद्धा मला समजत नव्हता. एकेदिवशी त्यांचे डान्स मास्टर सोहनलाल यांनी त्यांच्या गळ्यात काळा धागा बांधला होता. काळा धागा बांधल्यामुळे लग्न झाल्याचे सरोज यांना वाटले होते.
पुढे वाचा, नव-याने लपवली होती विवाहित असल्याची गोष्ट...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.