आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक मुलगा आणि तीन मुलींचा पिता आहे दलेर मेहंदी, सून आहे टॉप क्लास मॉडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः लोकांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पॉप गायक दलेर मेहंदीला पतियाळा कोर्टाने दोषी ठरवत 2-2 वर्षांची कैद सुनावली. दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी एक-एक हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. 14 वर्षांपर्यंत लांबलेल्या खटल्यात न्यायाधीश सैनी यांनी शुक्रवारी शिक्षेची घोषणा केली. यानंतर केवळ दहाच मिनिटांत दलेर मेहंदीची 40 हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेरवर आरोप होता, की त्यांनी काही लोकांना आपल्या टीममध्ये असल्याचे सांगून बेकायदेशीररित्या विदेशात घेऊन गेले होते. यासाठी ते मोठी रक्कम घेत होते. हे प्रकरण 1998 ते 2003 दरम्यानचे आहे. 

 

आपल्या आवाजामुळे संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या दलेर मेहंदीचे लग्न तरणप्रीत कौरसोबत झाले असून या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. अजीत कौर मेहंदी, रबाब कौर आणि प्रभजोत कौर ही त्याच्या तिन्ही मुलींची तर गुरदीप मेहंदी हे मुलाचे नाव आहे. दलेरच्या चारही मुलांपैकी मुलगा गुरदीप इंडस्ट्रीत कार्यरत आहे. 


सून जेसिका आहे मॉडेल आणि अॅक्ट्रेस... 
- पंजाबी गायक दलेर मेंहदी यांचा मुलगा गुरदीप आणि जेसिका सिंग यांचे लग्न फिनलॅण्ड या युरोपियन देशात अगदी थाटात  झाले होते. या लग्नाला मेंहदी दलेरच्या कुटुंबीयांसोबत त्यांचे काही जवळचे मित्र सहभागी झाले होते. 
- दलेर मेहंदी यांची सून एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. विशेष म्हणजे या फिल्ममध्ये ती गुरदीपसोबत झळकली आहे.
- फिनलॅण्डमध्ये जन्मलेली जेसिका मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती मिस इंडिया युरोप या सौंदर्य स्पर्धेची पहिली रनरअप ठरली होती.
- लग्नापूर्वी जेसिकाने गुरदीपसोबत सिनेमात काम केले होते. हे दोघे 'दिल्ली 1984' या सिनेमात लीड रोलमध्ये झळकले होते.
- या दोघांनी लग्नाच्या वर्षभराआधी साखरपुडा केला होता. 
- रिपोर्ट्सनुसार, गुरदीप आणि जेसिका यांचे लव्ह मॅरेज आहे.


गुरदीपने बॉलिवूडमध्ये केलंय डेब्यू...
- वडील दलेर मेहंदीप्रमाणेच गुरदीप सिंगर आणि अॅक्टर आहे. 
- 2014 साली रिलीज झालेले त्याचे 'सहेली' हे गाणे हिट ठरले होते. त्याने भारतासोबतच परदेशात अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स केले आहेत. 
- 2013 साली सईद नूर यांच्या 'मेरी शादी कराओ' या सिनेमाद्वारे गुरदीपने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
- या सिनेमात गुरदीप लीड रोलमध्ये होता. त्याच्यासोबत राधिका वैद्य ही अभिनेत्री झळकली होती.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, दलेर मेहंदीचा मुलगा आणि सूनेचे Photos...