आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Danny Denzongpa Doing Three Films Back To Back This Year डॅनी डेन्जोंगपा

अखेर डॅनीने सांगितले का सोडली होती 'गब्बर'ची भूमिका, 43 वर्षांनी उचलला पडदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बायोस्‍कोपवाला'मध्ये डॅनी डेन्जोंगपा - Divya Marathi
'बायोस्‍कोपवाला'मध्ये डॅनी डेन्जोंगपा

मुंबईः अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका वठवणारे अभिनेते डॅनी डेन्जोंगपा यावर्षी तीन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'बायोस्‍कोपवाला', 'मणिकर्णिका : क्‍वीन ऑफ झांसी' आणि 'बॅटल ऑफ सारागडी' हे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. गेल्यावर्षी ते  'नाम शबाना'या चित्रपटात एका छोटेखानी भूमिकेत झळकले होते. अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या डॅनी यांना  'शोले'मधील गब्बर सिंहची भूमिका ऑफर झाली होती. पण त्यांनी ती भूमिका नाकारली होती.

 

DainikBhaskar.com सोबतच्या बातचितमध्ये तब्बल 43 वर्षांनी त्यांनी गब्बरची भूमिका का सोडली, याचा खुलासा केला. शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी जेव्हा डॅनी यांना शोले चित्रपटाची ऑफर दिली होती, त्यावेळी  त्यांनी 'धर्मात्मा' या चित्रपटासाठी फिरोज खान यांना तारखा दिल्या होत्या. शोलेपूर्वी त्यांना धर्मात्माची ऑफर मिळाली होती. या चित्रपटासाठी फिरोज खान यांनी अफगानिस्तानात शूटिंगसाठी परवानगीदेखील घेतली होती. त्यामुळे शूटिंग पुढे ढकलणे त्यावेळी शक्य नव्हते. त्यामुळे तारखा जुळून न आल्याने डॅनी यांनी रमेश सिप्पी यांना नकार दिला होता. त्यांनी मुलाखतीत पुढे सांगितले, 'गब्बरची भूमिका सोडल्याचे कधीच मला दुःख वाटले नाही. कारण  'शोले'मुळे अमजद खान यांचे मानधन वाढले होते आणि त्यामुळे त्यांचेही मानधन ऑटोमेटिकली वाढले होते."


बलराज साहनींपासून प्रेरित आहे 'बायोस्कोपवाला'मधील भूमिका...
- डॅनी यांनी सांगितले, की 'बायोस्‍कोपवाला'मध्ये ते  'काबुलीवाला'मधील बलराज साहनी यांनी साकारलेल्या भूमिकेशी प्रेरित भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव रहमत खान आहे.

- डॅनी सांगतात, 'काबुलीवाला'प्रमाणेच रहमत खानसुद्धा अफगानिस्‍तानातून कोलकातामध्ये येतो. तो मिनी नावाच्या छोट्या मुलीमध्ये आपल्या मुलीची प्रतिमा बघत असतो.'  
- 'मणिकर्णिका : क्‍वीन ऑफ झांसी'मध्ये डॅनी यांनी गुलाम मोहम्मद गौस खान ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा झाशीच्या राणीचा खास रक्षक असतो. जेव्हा इंग्रज झाशीवर हल्ला चढवतात, तेव्हा गौस खान इंग्रजांविरुद्ध उभे ठाकले होते.
- 'बॅटल ऑफ सारागडी'मध्ये डॅनी यांनी अफगान सरदारची भूमिका वठवली आहे. यामध्ये रणदीप हुड्डा भारतीय सेनेच्या प्रमुखाच्या भूमिकेत आहे.
- डॅनी यांनी सांगितले, की 'बॅटल ऑफ सारागडी'च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

 

चित्रपटांच्या माध्यमातून अफगान कनेक्शन...
डॅनी यांनी सांगितले,  'चित्रपटांच्या माध्यमातून माझे अफगान कनेक्शन राहिले आहे. फिरोज खान यांच्यासोबतच्या 'धर्मात्‍मा' आणि अमिताभ बच्‍चनसोबतच्या 'खुदा गवाह' या चित्रपटांचा बेस अफगानिस्‍तान होता. 'खुदा गवाह'च्या चित्रीकरणाच्या वेळी तेथे तालिबानींची सावली होती. आम्ही त्या भीतीच्या वातावरणात तेथे शूटिंग केले होते. तो अतिशय रोमांचक अनुभव होता.  'बायोस्‍कोपवाला'च्या शूटिंगसाठी आम्ही अफगानिस्तानात गेलो नाही. याचे सर्व शूटिंग लद्दाखमध्ये आम्ही केले. 'बॅटल ऑफ सारागडी'च्या बाबतीतही असेच घडण्याची शक्यता आहे. याच्या शूटिंगसाठीही आम्ही अफगानिस्तानात जाणार नाही.'


पुढील स्लाईड्सवर बघा, डॅनी यांची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...