आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2018 मध्ये समुद्र किनारी लग्न थाटतील रणवीर-दीपिका! या अभिनेत्रीला बोलावणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या अफेअरची चर्चा तर आपल्या कानावर आलेली आहेच. परंतू हे दोघे लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याच्या चर्चा आता बी-टाउनमध्ये सुरु झाल्या आहेत. सुत्रांनुसार यावर्षी जून-जुलैच्या काळात हे दोघे लग्न करणार आहे. काही दिवसांपुर्वी दीपिका आपली बहिण अनीशासोबत नेहा धूपियाच्या शोमध्ये गेली होती. यावेळी दीपिकाला लग्नाविषयी विचारले तर ती याविषयी काहीच बोलली नाही. परंतू तिची बहिण अनीशाने म्हटले होते की, लग्नात बॉलिवूड अॅक्ट्रेस कतरिनाला बोलावणार नाही. 

 

पब्लिकली स्विकारले नाही अफेअर
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या ऑन स्क्रीन केमेस्ट्रीसोबत त्यांची ऑफ स्क्रिन केमेस्ट्रीही तितकीच चांगली आहे. हे दोघे दिर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी पब्लिकली अफेअर मान्य केले नाही, परंतू त्यांचे अफेअर आहे हे स्पष्ट आहे. दीपिकाच्या वाढदिवसाला रणवीर सिंहच्या आईने तिला डायमंड रिंग आणि साडी गिफ्ट केली होती. त्यावेळी दोघांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.


सुत्रांनुसार दोघांच्या घरी लग्नाची तयार सुरु झाली आहे. यांचे लग्न मालदिवमध्ये होऊ शकते. लग्नाचे रिसेप्शन मुंबई आणि बेंगलुरुमध्ये होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिका-रणवीरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...