आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाने \'त्या\' व्यक्तीची कॉलर पकडून लावली होती कानशिलात, अशी होती वडिलांची प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पद्मावती' मध्ये 'राणी पद्मावती'ची भूमिका साकारणारी दीपिका ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या तिचा 'पद्मावती' बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाने घेत आहे. परंतू या चित्रपटाने रिलीज होण्यापुर्वी अनेक संकटांचा सामना केलाय. या काळात दीपिकाला अनेक धमक्या मिळाल्या होत्या. तरीही दीपिका घाबरली नाही आणि ठामपणे उभी राहिली. नंतर सेन्सॉर बोर्डाने काही अटी ठेवून चित्रपट प्रदर्शित होण्यास हिरवा कंदील दाखवला. याच काळात एका इंटरव्ह्यूमध्ये दीपिकाने एक किस्सा सांगितला होता. दीपिकाचा झाला होता विनयभंग...

 

- दीपिका म्हणाली "मी जेव्हा 14-15 वर्षांची होते, तेव्हा आम्ही सर्व लोक रेस्तरॉमध्ये जेवण्यासाठी गेलो होतो. माझे वडिल आणि बहिण थोडे समोर होते आणि मी आणि आई मागे होतो."
- "याच वेळी एका व्यक्तीने मला मागून धक्का दिला. मी अगोदर त्याला इग्नोर केले आणि मला काही कळालेच नाही असे दाखवले. परंतू थोड्या वेळीने मी मागे वळले आणि त्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याच्या कानशिळात लावली. त्या दिवशी माझ्या वडिलांना विश्वास बसला की, मी स्वतःचे संरक्षण स्वतः करु शकते."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिका पदूकोणचे रेअर फॅमिली फोटोज, वडील आणि आईसोबत असा घालवते वेळ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...