आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर सिंगसोबत दीपिका पादुकोणची लगीनघाई! ज्वेलरी शॉपमध्ये आईसोबत केली खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. सोनम कपूर, नेहा धुपिया आणि हिमेश रेशमियानंतर आता दीपिाकही लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. बुधवारी दीपिकाला आई उज्जवला पादुकोणसोबत बांद्रामध्ये शॉपिंग करताना पाहिले गेले. यावेळी दीपिका तिच्या ज्वेलरीसाठी शॉपिंग करत असल्याची चर्चा होत आहे. असे म्हटले जात आहे की येत्या 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान दीपिका-रणवीर विवाहबंधनात अडकणार आहेत. एका खासगी समारंभात हे लग्न पडणार आहे. 

 

- दीपिकाची आई सध्या मुंबईत आहे आणि दीपिाक शूटिंगमधून वेळ काढून आईसोबत शॉपिंग करत आहे. दीपाक तनिष्क ज्वेलरीबाहेर स्पॉट झाली आणि दीपिका याची ब्रँड अॅम्बेसेटर आहे. दीपिकाने तिच्या आईसोबत तनिष्कच्या जाहिरातीतही काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणवीर-दीपिका डेस्टीनेशन वेडींग करणार होते पण रणवीरच्या आईवडिलांची मुंबईत ल्गन व्हावे अशी इच्छा असल्याने हे लग्न मुंबईत पार पडणार आहे. 

 

दीपिकाला रिंग आणि साडी गिफ्ट केले रणवीरच्या आईने..
अशी माहिती मिळते की रणवीरच्या आईने दीपिकाला हिऱ्यांची रिंग आणि साडी गिफ्ट केली आहे. हे खास गिफ्ट दीपिकाला तिच्या वाढदिवसानिमित्त मिळाले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रणवीर सिंग-दीपिका पादुकोणचे काही खास फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...