आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 कट्सनंतर रिलीज होणार \'पद्मावत\'! आता असा असेल चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः डायरेक्टर संजय लीला भन्साळींचा 'पद्मावत' हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. मात्र चित्रपटाला कट्स लावल्यानंतर हा चित्रपट रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. एका इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, चित्रपटातून दिल्ली, चित्तौड आणि मेवाडचा उल्लेख वगळण्यात आला आहे. 

 

आता काल्पनिक होणार चित्रपटाचे कथानक..  

- रिपोर्ट्सनुसार, 25 जानेवारी रोजी प्रेक्षक जो चित्रपट थिएटरमध्ये बघतील, तो आता संपुर्णतः काल्पनिक कथानकावर बेतलेला असेल. कारण चित्रपटातून महत्त्वाच्या ठिकाणांची नावे वगळण्यात आल्यामुळे ही ऐतिहासिक घटना नेमकी कुठे घडली होती, ते कळणार नाही.
-  अलाउद्दीन खिलजी कोठून आला आणि राजपुतांसोबत त्याचे युद्ध कुठे झाले, याचा संदर्भ चित्रपटातून वगळण्यात आला आहे.

 

सुरु आहे चित्रपटाचे री-एडिटिंग... 
-  सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या सुचनांनुसार, सध्या या चित्रपटाचे री एडिटिंगचे काम सुरु आहे.
- रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात उल्लेख करण्यात आलेल्या सर्व ठिकाणांना आता काल्पनिक नावे दिली जाणार आहेत. 

 

पुढे वाचा, चित्रपटाशी निगडीत काही महत्त्वाच्या अपडेट्स.. 

बातम्या आणखी आहेत...