आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone To Play Draupadi In Aamir Khan Mahabharat महाभारत आमिर खान दीपिका पदुकोण

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'महाभारत'मध्ये द्रौपदी होणार का दीपिका! आमिरसोबत पहिल्यांदा करणार स्क्रिन शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान सध्या 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असून या चित्रपटानंतर तो 'महाभारत' या चित्रपटावर काम करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘लार्जन दॅन लाइफ’ अनुभव देण्याचा आमिरचा प्रयत्न आहे. या चित्रपटात आमिर स्वतः श्रीकृष्णाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. तर द्रौपदीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणच परफेक्ट असल्याचे आमिरचे मत आहे. या भूमिकेसाठी त्याची पहिली पसंती दीपिकालाच आहे. पण 'पद्मावत' हा एपिक चित्रपट केल्यानंतर आणि त्यावरुन निर्माण झालेल्या वादंगानंतर दीपिका आमिरचा हा चित्रपट स्वीकारणार का हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

...तर आमिरसोबत पहिल्यांदा काम करणार दीपिका... 

- जर दीपिकाने आमिरची ही ऑफर स्वीकारून द्रौपदीच्या भूमिकेसाठी होकार दिला, तर तिचा हा त्याच्यासोबतचा पहिलाच चित्रपट ठरेल. दीपिकाने आतापर्यंत तिन्ही खानांमध्ये फक्त शाहरुखसोबतच काम केले आहे.  


चित्रपटावर मुकेश अंबानी लावणार पैसा... 
आमिर खानच्या या महत्त्वकांक्षी चित्रपटाचा खर्च मुकेश अंबानी उचलणार असल्याचे म्हटले जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी या चित्रपटावर तब्बल 1000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे वृत्त आहे. मुकेश अंबानी आमिरच्या या चित्रपटाचे को-प्रोड्युसर असतील. मुकेश अंबानी यांनी अलीकडेच इरोज इंटरनॅशनल आणि एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शन या कंपनीवर पैसा लावला आहे.

 

एक नव्हे अनेक भागात बनणार 'महाभारत'

- रिपोर्ट्सनुसार, आमिर हा चित्रपट सीरिजमध्ये प्रदर्शित करणार असून याचे एकुण पाच चित्रपट बनणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक भागासाठी दिग्दर्शकसुद्धा वेगवेगळे असतील. या चित्रपटांसाठी आमिरला 10 ते 15 वर्षांचा काळ लागू शकतो. मुकेश अंबानी हे चित्रपट व्हायकॉम 18 अंतर्गत प्रोड्युस करतील की यासाठी नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरु करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

प्रत्येक भागासाठी वेगळे दिग्दर्शक...

- आमिर खान त्याच्या या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टची जबाबदारी एकापेक्षा अधिक दिग्दर्शकांवर सोपवणार आहे. सीरिजचा पहिला चित्रपट दिग्दर्शक अद्वैत चंदन असतील. त्यांनीच आमिरचा 'सीक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तर एका भागाचे दिग्दर्शन आमिर खान स्वतः करणार आहे.

 

'मोहनलाल' यांच्या महाभारतावर काम सुरु...

दुबईत वास्तव्याला असलेले भारतीय वंशाचे बिझनेसमन बीआर शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी 1 हजार कोटींच्या निर्मिती खर्चात महाभारतावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध अॅड गुरू वीए श्रीकुमार मेनन दिग्दर्शित करणार आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. 2020 में रिलीज होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मल्याळम अभिनेते मोहनलाल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत

 

(सर्व इलेस्ट्रेशन : साभार हरिओम तिवारी)

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, महाभारताच्या बॉलिवूड व्हर्जनमध्ये कोणते कलाकार कोणत्या भूमिकेत बसतील फिट...

बातम्या आणखी आहेत...