आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराटप्रमाणे इटलीत डेस्टीनेशनल वेडींग करणार लव्हबर्डस दीपिका-रणवीर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर यांचे लग्न चर्चेत आले आहे. पहिले अशी बातमी होती की हे कपल मुंबईतच 18-20 नोव्हेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. एका प्रसिद्ध वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार दीपिका-रणवीर यांना डेस्टीनशन वेडींग करण्याची इच्छा आहे आणि मीडियापासून दूर राहण्यासाठी ते इटलीच हे लग्न करु शकतात अशी चर्चा आहे.
 
पहिले अशी बातमी आली होती की स्वीत्झर्लँड सरकारने या दोघांना त्यांच्या देशात लग्न करण्याची ऑफर दिली होती कारण रणवीर सिंह स्वीत्झलँड टुरीझमचा ब्रँड अॅम्बेस्टरही आहे. तर रणवीर-दीपिका त्यांचे लग्न संस्मरणीय करण्यासाठी खास लोकेशनच्या शोधात आहेत. अशातच इटालियन गव्हर्मेंटनेही त्यांना लग्नसोहळ्याची ऑफर दिली आहे. अनुष्का -विराटने 11 डिसेंबर 2017 साली इटलीतच विवाह केला. 

 

सध्या रणवीर सिंग सिम्बा चित्रपटाच्या शूटमध्ये बिझी आहे आणि नोव्हेंबरअगोदर तो ते काम संपवण्याच्या घाईत आहे. तर दीपिकाने पद्मावतनंतर कोणताच चित्रपट साईन केला नाही. दीपिकाने इरफान खानसोबत 'सपना दीदी' साईन केला होता पण इरफान यांच्या आजारपणामुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रणवीर-दीपिकाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...