आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhadak Recreate 6 Iconic Scene From Sairat With Ishaan Khattar And Jhanvi Kapoor

'Dhadak' आणि सैराटच्या कथेत 6 सीन झाले रीक्रिएट, फोटोजमध्ये पाहा त्याचे खरे व्हर्जन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा 'धडक' हा चित्रपट रिलीज झाला आहे. फक्त चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला आहे. सैराटच्या कथेला रंग-रुप-वेश-भाषा बदलून दर्शकांसमोर मांडण्यात आलेय. चित्रपटातील काही सिन्स हुबेहूब कॉपी करण्यात आले आहेत. यावरून तुम्हाला सैराट पाहत असल्याचा भास होईल. धडकमध्ये सैराटचे जे सीन घेण्यात आले आहेत, ते सीन खुप क्लासी होते, यांच्याशिवाय धडक छाप सोडू शकला नसता. यामुळे सैराटचे 6 आयकॉनिक सीन्स ईशान आणि जान्हवीसोबत रीक्रेअट करण्यात आले आहेत.

 

1. इशा-यांवर बोलणे
- सैराटमध्ये याड लागल गाण्यामध्ये आकाश आणि रिंकूवर एक सीन शूट करण्यात आला आहे. तेव्हा आकाश विहिरीत उडी मारतो आणि रिंकू आपल्या मैत्रिणींसोबत तिथे पहिलेच उपस्थित असते. विहिरीतून बाहेर येताना रिंकू आणि आकाश डोळ्यांच्या इशा-यांनी बोलताना दिसतात.

- धडकमध्ये हाच सीन जान्हवी आणि ईशान यांच्यामध्ये चित्रित करण्यात आलेला आहे. ईशान विहिरीमधघ्ये उडी मारतो. यामध्ये जान्हवी आपल्या मैत्रिणींसोबत पहिलेच मस्ती करताना दिसते. येथे बॉलिवूड लव्ह स्टोरी फॉर्मेट प्रमाणे ईशान जान्हवी एकमेकांसोबत डोळ्यांमध्ये बोलताना दिसतात.

 

2. क्लासरुम रोमान्स
- सैराटचा एक सीन क्लासरुममध्ये आहे. येथे रिंकू क्लासमध्ये येते आणि आपल्या जागेवर बसून आकाशकडे पाहते. आकाश तिच्या मागच्या साइडला बसलेला असतो.
- जान्हवीने रिंकूचा तो सीन रिक्रिएट केला आहे. परंतू चेह-यावर रिंकू सारखे एक्सप्रेशन आणणे तिला जमले नाही. परंतू हा सीनही उत्कृष्ट झाला आहे. 

 

3. लव्ह कन्फेशन
- सैराट चित्रपटात शेतामध्ये रिंकू आपले प्रेम आकाश जवळ व्यक्त करते. येथे आकाश तिचे उत्तर देताना लाजतो.
- परंतू धडक चित्रपटात हा सीन हवेलीच्या एरियामध्ये चित्रित करण्यात आला आहे. ये जान्हवी ईशानला 'आय लव्ह यू' म्हणते आणि त्यालाही म्हणायला लावते. परंतू डायरेक्टर शशांकने हा सीन थोडा फनी बनवला आहे.

 

4. प्रेमासाठी पळून जातात लव्ह बर्ड्स
- रिंकू आणि आकाशचे पात्र सैराट चित्रपटात एकमेकांचे प्राण वाचवण्यासाठी पळून जातात. याच काळात रिंकूच्या हातात बंदूक दिसते, ती गरज पडल्यावर या बंदूकचा वापर करते.
- धडकच्या ट्रेलरमध्ये दिसले की, जान्हवी बंदूक हातात घेऊन दिसत आहे. ती ही बंदूक पोलिसांकडून हिसकावून घेते आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवून धमकावताना दिसते. जान्हवीचे कॅरेक्टर दमदार दिसावे म्हणून असे करण्यात आलेले आहे.

 

5. आणि नंतर होतो वाद
- सैराटच्या एका सीनमध्ये आकाश आणि रिंकूमध्ये भांडण होते.
- असाच सीन धडकच्या ट्रेलरमध्ये दिसतो. यामध्ये जान्हवी आणि ईशानमध्ये वाद झालेला पाहायला मिळतो. 

 

6. सुपरहिट झिंगाट गाणे
- मारठीमध्ये अजय-अतुलने हे सुपरहिट गाणे तयार केले आहे. यामध्ये आकाश आणि रिंकू डान्स करताना दिसते. यासोबतच मराठीमधील याड लागले हे गाणे हिंदीमध्ये तयार करण्यात आले आहे. 
- धडकमध्ये या गाण्यांचे हिंदी व्हर्जन पाहायला मिळते. यामध्ये ईशान आणि जान्हवीचे डान्सिंग टॅलेंट समाविष्ट करण्यात आले आहेत. 

 


 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...