आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhadak Starcast Fees: Sridevi Daughter Jhanvi Kapoor To Shahid Brother Ishaan Khatter

'धडक'च्या स्टारकास्टची फीस: श्रीदेवीची मुलगी जान्हवीला मिळाले सर्वात कमी पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर 'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मराठी ब्लॉकबस्टर फिल्म 'सैराट' चित्रपटाचा हा रिमेक आहे. धर्मा प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर शशांक खैतानने या चित्रपटाचे डायरेक्शन केले आहे. येत्या 20 जुलैला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. परंतू तुम्हाला माहिती आहे का की, चित्रपटाच्या डेब्यूसाठी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला 1 कोटीही फीस मिळालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिला या चित्रपटासाठी फक्त 40 ते 45 लाख रु. फीस देण्यात आली आहे. फक्त जान्हवीच नाही तर चित्रपटाच्या हिरोलाही काही विशेष फीस देण्यात आलेली नाही. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला चित्रपटाच्या स्टारकास्टच्या फीसविषयी सांगणार आहोत.


1. ईशान खट्टर
शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या चित्रपटात नायकाची भूमिका साकारत आहे. त्याला 60 ते 70 लाख रु. फीस देण्यात आली. 'धडक' हा त्याचा डेब्यू चित्रपट नाही. यापुर्वी त्याने माजिद मजीदीचा चित्रपट 'बियॉन्ड द क्लाउड'मध्ये काम केले आहे.


2. आशुतोष राणा
'धडक'मध्ये आशुतोष राणा हीरोइन जान्हवीच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांना 50 लाख रु. मिळाले आहेत.


3. शशांक खेतान
'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' चित्रपट डायरेक्ट केलेल्या शशांकने जान्हवीचा डेब्यू चित्रपट डायरेक्ट केला आहे. यासाठी त्याला 4 कोटी रुपये फीस देण्यात आली आहे.


4. नागराज मंजुळे
मराठी चित्रपट 'सैराट'ची कथा नागराज मंजुळे यांनी लिहिली आहे. 'धडक' या चित्रपटाचा रिमेक आहे. नागराजला या कथेसाठी 2 कोटी रु. फीस देण्यात आली आहे.


5. अजय-अतुल
चित्रपटाचे म्यूझिक अजय-अतुलच्या जोडीने दिले आहे. दोघांना या कामासाठी जवळपास 1.5 कोटी रु. फीस मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...