आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dharmendra Have Two Wive And Six Children But Still He Alone Enjoying Vacation In Goa

PHOTO : पत्नी-मुलांशिवाय एकटेच हॉलिडे एन्जॉय करत आहेत 82 वर्षीय धर्मेंद्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई:  82 वर्षीय धर्मेंद्र सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव आहेत. कधी शेतात काम करताना तर कधी बागेत आंबे तोडताना तर कधी जनावरांना चारा चारतानाचे फोटोज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.  सध्या धर्मेंद्र गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी इंस्टाग्रामवर जो लेटेस्ट फोटो शेअर केला त्यामध्ये ते पत्नी किंवा मुलांसोबत नव्हे तर एकटेच गोवा फिरताना दिसत आहेत. त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांना सगळेच ओळखतात. पण त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या कायम लाइमलाइटपासून दूर राहतात.  


प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, धर्मेंद्र चांगले पती नाही पण खूप चांगले वडील आहेत...  
1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत अरेंज्ड मॅरेज झाले होते. या दाम्पत्याला एकुण चार मुले आहेत. अजय सिंह (सनी), विजय सिंह (बॉबी), विजेता आणि अजेता देओल ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. धर्मेंद्र यांच्या दुस-या लग्नानंतर अनेक प्रकारच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. असेही म्हटले गेले होते, की सनी देओलने हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. मात्र जेव्हा या बातम्या आल्या होत्या, तेव्हा प्रकाश कौर यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी म्हटले होते, की धर्मेंद्र यांची बाजू घेताना म्हटले होते, की ते एक चांगले पती नसतील, मात्र एक खूप चांगले वडील आहेत. प्रकाश कौर यांनी 1981मध्ये 'स्टारडस्ट' या प्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत हे म्हटले होते.

 

मुलाखतीसाठी तयार नव्हत्या प्रकाश कौर
मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, प्रकाश कौर यांची मुलाखत घेणे हे सोपे काम नव्हते. त्या फोनवर कुणाशी बोलायच्या नाही, शिवाय घरीसुद्धा कुणाला भेटायच्या नाही. रिपोर्टर दररोज त्यांच्या घरी फे-या घालायची, मात्र तिला कोणतेही कारण देऊन परत पाठवून द्यायचे. कधी सांगितले जायचे, की प्रकाश कौर घरी नाहीत, तर कधी त्या झोपल्या आहेत, असे रिपोर्टरला सांगितले जायचे. मात्र सरतेशेवची रिपोर्टरच्या प्रयत्नांना यश आले आणि प्रकाश कौर मुलाखत द्यायला तयार झाल्या.

 

इंग्रजी येत नसल्याचे दिले होते कारण
मुलाखतीदरम्यान प्रकाश कौर यांनी इंग्रजी येत नसल्याचे कारण दिले होते. त्यांनी रिपोर्टरला म्हटले होते, की ''माझी इंग्रजी चांगली नाहीये. त्यामुळे मी काहीही सांगू शकत नाही.'' जेव्हा रिपोर्टर तेथून जायला तयार झाली नाही, तेव्हा प्रकाश कौर म्हणाल्या, "मी एक गृहिणी आहे. माझे माझ्या घरावर आणि मुलांवर जीवापाड प्रेम आहे. लोक माझ्या राहणीमानाविषयी काय म्हणतात, हे मला ठाऊक नाही. सर्वांचे स्वतःचे एक राहणीमान असते."


धर्मेंद्र पहिले आणि शेवटचे पुरुष... 
मुलाखतीत प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, की धर्मेंद्र त्यांच्या आयुष्यात येणारे पहिले आणि शेवटचे पुरुष आहेत. त्या पुढे म्हणाल्या, ते माझ्या मुलांचे वडील आहेत. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मी त्यांचा आदर करते. जे घडतंय, त्यासाठी मी काहीही करु शकत नाही. मी त्यांना दोषी ठरवावे, की नशीबाला हे मला माहित नाही. मला एक गोष्ट ठाऊक आहे, ती म्हणजे, ते माझ्यापासून कितीही दूर गेले, तरीदेखील जेव्हा मला त्यांची गरज असेल, तेव्हा ते नक्कीच माझ्याजवळ असतील. मी त्यांच्यावरचा माझा विश्वास गमावलेला नाही. काहीही झाले तरी ते माझ्या मुलांचे वडील आहेत. 

 

धर्म बदलून धर्मेंद्र यांनी केले होते दुसरे लग्न... 
- 16 ऑक्टोबर 1948 रोजी तामिळनाडू येथे जन्मलेल्या हेमा यांनी 1980 मध्ये बॉलिवूडचे 'हीमॅन' अर्थातच अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न थाटले. 
- दोघांना धर्म बदलून लग्न करावे लागले होते. याचे कारण म्हणजे धर्मेंद्र विवाहित होते. होय, धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले होते.
- धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत 1954 मध्ये झाले होते. त्यावेळी हेमा केवळ सहा वर्षांच्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...