आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dharmendra Share A Photo From The Of Yamla Pagla Deewana Phir Se Dharmendra Share A Photo From The Of Yamla Pagla Deewana Phir Se

आता असे दिसतात धर्मेंद्र, 3 वर्षांनंतर दिसतील या चित्रपटात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतकाळातील अभिनेते धर्मेंद्र यांचा लेटेस्ट फोटो समोर आलाय. या फोटोमध्ये धर्मेंद्र एका चेअरवर बसलेले दिसत आहेत आणि सडपातळ दिसत आहेत. त्यांनी ब्लॅक पँट आणि प्रिंटेड ब्लॅक कोट घातला आहे. यासोबतच त्यांनी ब्लॅक हॅटही घातलीय. हा फोटो त्यांनी 'यमला पगला दीवाना फिर से' च्या सेटवरुन शेअर केलाय. या चित्रपटात ते 3 वर्षांनंतर सिल्वर स्क्रीनवर दिसतील. चित्रपटात ते आपली दोन मुलं सनी देओल आणि बॉबी देओलसोबत दिसतील. चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु आहे. यावर्षी 30 मार्चला चित्रपटा रिलीज होणार आहे.


- 'यमला पगला दीवाना' सीरिजचा तिसरा चित्रपट यावर्षी 30 मार्चला रिलीज होईल. चित्रपटाच्या सेटवरुन धर्मेंद्र यांनी आपला एक फोटो शेअर केलाय. या फोटोवर त्यांनी 'Aapse jude haseen khwaabon ka mere, silsila ye... yun-hi chalta rahe! Yun-hi chalta rahe!! Nearing completion... on set #ypdphirse' असे कॅप्शन दिलेय. या फोटोवर सनी देओलने 'हँडसम पापा' अशी कमेंट दिली आहे.


'यमला पगला दीवाना फिर से' हा चित्रपट धीरज रतनच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाची थीम पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. धीरज रतन यांनी नुकतेच  'कप्तान', 'सरदारजी 2', 'अंबरसरिया', 'शरीक', 'सरदार जी' सारखे पंजाबी चित्रपट लिहिले आहेत.  'यमला पगला दीवाना फिर से' दिग्दर्शन नवनीत सिंह करत आहेत. चित्रपटात बॉबी देओल, काजल अग्रवाल, कृति खरबंदा दिसणार आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा  'यमला पगला दीवाना फिर से' काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...